उजनीचं पाणी पेटणार : जयंत पाटलांच्या घरासमोर शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

उजनी पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामध्ये आता बळीराजा शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे.
Jayant Patil News in Marathi, Solapur News, Solapur water crisis News
Jayant Patil News in Marathi, Solapur News, Solapur water crisis Newssarkarnama

पंढरपूर : "इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना रद्द करावी, या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या (Baliraja Farmers Association) वतीने येत्या १ जूनपासून जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत आंदोलन केले जाणार आहे," अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन बागल यांनी दिली. (Jayant Patil News in Marathi)

उजनी पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामध्ये आता बळीराजा शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. या संदर्भात गुरुवारी संघटनेची पंढरपुरात बैठक झाली. या बैठकीमध्ये उजनीतून इंदापूर तालुक्यासाठी मंजूर करण्यात आले आलेले पाणी रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपला मतदार संघ सुरक्षीत ठेवण्यासाठी सोलापूर चे पाणी पळवल्याचा आरोप करत नितीन बागल यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Jayant Patil News in Marathi, Solapur News, Solapur water crisis News
वाजपेयी, गांधी यांच्या विरोधात लढणारी व्यक्ती राज्यसभेच्या रिंगणात ; ही २३० वी निवडणूक

उजनी धरणातील पाणी इंदापूर तालुक्यातील लाकडी- निंबोडी योजनेसाठी देण्याच्या निषेधार्थ काही दिवसापूर्वी मोहोळ भाजपच्या वतीने मोहोळ येथील तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. (Solapur water crisis News)

उजनी जलाशयातील पाण्यावर पालकमंत्री दत्ता भरणे यांनी पुन्हा एकदा दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे, हा आदेश रद्द न झाल्यास पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नसून पालकमंत्र्याला व मोहोळच्या आमदारला हीच कामगिरी दिली आहे काय? असे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर यांनी केले होते.

Jayant Patil News in Marathi, Solapur News, Solapur water crisis News
MNS : 'मला डावललं जातयं' म्हणणाऱ्या वसंत मोरेंची नाराजी दूर होईल का?

जिल्ह्यातील आष्टी, शिरापूर, सीना माढा, या उपसा सिंचन योजनेसह अनेक योजना अपुऱ्या आहेत. तसेच, मोहोळ शहराचा पाणी प्रश्न तसाच लटकला आहे. त्यासाठी शासन निधी देत नाही. मात्र, इंदापूर तालुक्याला पाणी न्यावयाचे म्हणल्यावर त्यासाठी 348 कोटीचा निधी मंजूर केला आहे. हा कुठला न्याय, उजनीतील सर्व पाण्याचे वाटप झाले आहे, असे सुशील क्षीरसागर म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com