Basanagouda Patil Yatnal: Sarkarnama
देश

BJP News: मला पक्षातून काढलं तर भष्ट्राचाराचा भांडाफोड करणार; भाजप आमदाराने पक्षाच्या विरोधात ठोकला शड्डू

Basanagouda Patil Yatnal: प्रत्येक कोरोना रुग्णाच्या नावे 8 ते 10 लाखांचं बिल बनवलं.

Mangesh Mahale

Karnataka : कर्नाटकमध्ये भाजपच्या आमदारानेच पक्षश्रेष्ठींच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. भाजप आमदाराने दिलेल्या इशाऱ्यानंतर कर्नाटकात राजकारण तापलं आहे.

"मला पक्षातून काढलं तर मी कोरोना काळातील भष्ट्राचार प्रकरणाचा भांडाफोड करणार," असा इशारा विजयपूर मतदारसंघातील भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी दिला आहे.

येडीयुराप्पा सरकारने कोरोना काळात ४० कोटी रुपयांचा भष्ट्राचार केला असल्याचा आरोप आमदार यत्नाळ यांनी केला आहे. सरकार आमचे असले म्हणून काय झाले, शेवटी चोर तो चोरच असतो, असे सांगत त्यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे.

येदियुरप्पा सरकारने 45 रुपयांचे मास्क 485 रुपयांत खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. "बंगळुरुत 10 हजार बेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी भाड्याने 10 हजार बेड्स मागवण्यात आले होते. जेव्हा मला कोविड झाला तेव्हा मणिपाल रुग्णालयाने 5 लाख 80 हजार रुपये मागितले होते. गरीब माणूस इतके पैसे कुठून आणणार?" असे यत्नाळ म्हणाले

"जर आपल्याला पक्षातून काढलं तर आपण त्या लोकांची नावं उघड करु ज्यांनी पैसे लुटले आणि संपत्ती कमावली, अशी धमकीच त्यांनी दिली आहे. येदियुरप्पा यांचं सरकार असताना 40 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यांनी प्रत्येक करोना रुग्णाच्या नावे 8 ते 10 लाखांचं बिल बनवलं आहे असा आरोप त्यांनी केला आहे. यत्नाळ यांच्या या आरोपावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, " यत्नाळ यांनी कोरोनाबाबत केलेला आरोप हा आमच्या अंदाजानुसार १० पटींनी जास्त आहे,"

तर देशाला कोण वाचविणार?

बसनगौडा म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुळेच देश वाचला आहे. भाजपने मला नोटीस देऊन पक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर सर्वांचा बुरखा फाडून टाकेन. जर प्रत्येकजण चोर झाला तर राज्य आणि देशाला कोण वाचवणार? देश पंतप्रधान मोदींमुळे वाचला आहे. या देशात भूतकाळात कोळसापासून ते 2 जीपर्यंत अनेक घोटाळे झाले आहेत."

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT