Politics Maharashtra : शिवसेनेत बंड झाल्यापासून राज्याच्या राजकारणात रोज नव्याने घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलच तापलेलं आहे.
''राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळेच आम्ही महाविकास आघाडीमधून बाहेर पडलो'', असं शिवसेनेतील (शिंदे गट) नेते सांगतात. मात्र, आज उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रतोद भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.
त्यांनी ही भेट 'सिल्व्हर ओक'वर जावून घेतली आहे. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली याबात अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
उदय सामंत यांनी याविषयी ट्विट देखील केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आहे, असं सामंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, ही भेट कशा संदर्भात होती, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या भेटी दरम्यान कोणत्या मुद्यावर चर्चा झाली?, याबाबत राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.