Sheikh Hasina, Muhammad Yunus Sarkarnama
देश

Muhammad Yunus : यूनुस यांचा शेख हसीना यांना निर्वाणीचा इशारा; म्हणाले, भारतात राहायचे असेल तर...

Sheikh Hasina Bangladesh India : बांगदेशातून पलायन केलेल्या शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्यांच्याविरोधात विद्यार्थी आंदोलनाचा भडका उडाला होता.

Rajanand More

New Delhi : बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. भारतात राहून बांगलादेशविरोधात राजकीय विधाने करत असलेल्या हसीना यांनी गप्प राहावे, असे यूनुस यांनी म्हटले आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना यूनुस यांनी पहिल्यांदाच एवढ्याच कडक शब्दांत हसीना यांना स्पष्ट संदेश दिला आहे. शेख हसीना भारतातून राजकीय भाष्य करत आहेत. हे योग्य नाही. दोन्ही देशांमधील सौहार्द कायम राहावे, यासाठी त्यांनी शांत राहावे, असे यूनुस यांनी स्पष्ट केले आहे.

बांगलादेश सरकारला त्या परत हव्या असेपर्यंत जर भारताला त्यांना तिथे ठेवायचे असेल तर त्यांना गप्प बसावेच लागेल, असे इशारा यूनुस यांनी दिला आहे. युनूस यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले आहे. हसीना यांच्या भूमिकेवरही भारतातही कुणी समाधानी नाही. अडचणीच्या काळात त्या बोलत आहेत. तिथे बसून सूचना करत आहेत. हे कुणालाही आवडलेले नाही, असेही यूनुस यांनी म्हटले आहे.

हसीना यांनी 13 ऑगस्ट रोजी बांगलादेशातील हिंसेवर भाष्य केले होते. नुकत्याच झालेल्या दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असलेल्यांची चौकशी व्हायला हवी. त्यांनी ओळख पटवून शिक्षा करायला हवी. न्याय मिळायला हवे, असे हसीना म्हणाल्या होत्या. त्यावरून भारताकडेही आपली भूमिका मांडल्याचे यूनुस यांनी स्पष्ट केले.

शेख हसीना यांना भारतात आसरा दिला आहे आणि त्या तिथून मोहिम चालवत आहेत. त्या चांगल्या वातावरणात तिथे गेलेल्या नाहीत. लोकांच्या रोषानंतर त्या पळून गेल्या आहेत, याकडेही यूनुस यांनी लक्ष वेधले. अत्याचारग्रस्त लोकांना न्याय देण्यासाठी आमचे सरकार कटिबध्द आहे. त्यांनी ज्यापध्दतीने अत्याचार केले आहेत, त्यासाठी त्यांना बांगलादेशात परत आणावे लागेल अन्यथा येथील लोकांना शांतता मिळणार नाही, असेही यूनुस म्हणाले आहेत.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT