Agniveer Scheme : ‘अग्निवीर’विषयी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; 'एनडीए'तून की विरोधकांचा दबाव?

NDA Government Agnipath Sceme Rajnath Singh : अग्निवीरला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून सातत्याने विरोध केला जात आहे.
Rajnath Singh, Narendra Modi
Rajnath Singh, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : विरोधकांसह एनडीएतील काही नेत्यांकडूनही जोरदार विरोध होत असलेल्या अग्निवीर योजने महत्वाचे बदल केले जाणार असल्याची चर्चा आहे. पण हे बदल इतक्यात होणार नाहीत, योग्यवेळी त्याबाबत घोषणा केली जाणार असल्याचे समजते. प्रामुख्याने अग्निवीरांना मिळणारे वेतन, पात्रता आणि त्यांच्या संख्येबाबत हे बदल असतील.

लष्करामध्ये अग्विवीर भरतीसाठी अग्निपथ ही योजना जून 2022 मध्ये सुरू करण्यात आली. याअंतर्गत सैनिकांची चार वर्षांसाठी लष्करात भरती केली जाते. मात्र, या योजनेला सुरूवातीपासून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी जोरदार विरोध आहे. भाजपमधील काही नेत्यांकडूनही विरोधकांच्या सुरात सूर मिसळला जातो.

Rajnath Singh, Narendra Modi
Parvez Musharraf : परवेझ मुशर्रफ यांचे ‘यूपी’तील 'नामोनिशान' मिटणार; योगी सरकारचा काय आहे प्लॅन?

लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने उत्तर प्रदेशात भाजपला अग्निवीर योजनेबाबत युवकांमध्ये असलेल्या नाराजीचा फटका बसल्याची चर्चा होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या योजनेवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. याअनुषंगाने योजनेत काही बदल केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अग्निवीर योजना अधिक सक्षम करण्यासाठी केंद्राकडून निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यासाठी वेतन, इतर लाभ वाढवले जाण्याची शक्यता आहे. अग्निवीरांची पात्रता आणि पक्की नोकरी मिळणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ शकते. लष्करातील अग्निवीरांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे समजते.

Rajnath Singh, Narendra Modi
Harayana Assembly : भाजपला हरियाणात दुसरा धक्का! पहिली यादी जाहीर होताच आमदाराने ठोकला रामराम..!

दरम्यान, सरकारच्या या प्रयत्नांबाबत काँग्रेसने एक्सवर पोस्ट करून योजना आम्ही बंद करूनच थांबू, असे आव्हान दिले आहे. मोदी सरकारला ही योजना बंद करावी लागेल, अन्यथा आम्ही बंद करू. विरोधकांच्या दबावामुळे काही बदल केले जातील, असे काँग्रेसने म्हटले आहे.

चार वर्षाच्या नोकरीनंतर आता 25 टक्क्यांऐवजी 50 टक्के अग्निवीरां पक्की नोकरी मिळण्याची शक्यता आहे. पण, हे पुरेसे नाही. अग्निवीर योजने लष्करविरोधी आहे. हा देशातील युवकांसोबत धोका आहे. राष्ट्राच्या सुरक्षेशी खेळ आहे. आता तर पुनर्विचार करण्यासाठी दबाव टाकला आहे. पण आम्ही ही योजना बंद करूनच थांबू, असे काँग्रेसने आव्हान काँग्रेसने दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com