Prime Minister Narendra Modi and Mallikarjun Kharge clash over India’s savings and GST collection figures. Sarkarnama
देश

Sardar Patel: PM मोदी सरदार पटेलांच्या विचारांचा खरंच सन्मान करत असतील तर...; काँग्रेसनं केली सर्वात मोठी मागणी

Sardar Patel: स्वतंत्र भारताचे पहिले उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना लोहपुरुष म्हणूनही ओळखलं जातं, त्यांची आज १५० वी जयंती आहे.

Amit Ujagare

Sardar Patel: स्वतंत्र भारताचे पहिले उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना लोहपुरुष म्हणूनही ओळखलं जातं. त्यांची आज १५० वी जयंती आहे. सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त मोदी सरकारनं ३१ ऑक्टोबर हा 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. या विशेष दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. पंतप्रधान मोदींनी नुकतेच त्यांचं स्मरण करताना काँग्रेसवर गंभीर आरोप करत काँग्रेस पटेलांना विसरली असल्याचं म्हटलं आहे. मोदींच्या या विधानावर पलटवार करताना काँग्रेसनं मोदींना थेट आव्हानच दिलं आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज एक मोठं विधान केलं यात त्यांनी म्हटलं की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्या विचारधारेवर बंदी घातली होती ज्या विचारधारेतूनच भाजपचा जन्म झाला आहे. आज पुन्हा एकदा सरदार पटेलांसारख्या लोपरुपुषाची गरज आहे ज्यानं या विचारधारेवर बंदी घातली पाहिजे. त्यामुळं तुम्हाला काय वाटतं की, पुन्हा एकदा RSS वर बंदी घालायला हवी का?

या प्रश्नाला उत्तर देताना खर्गे म्हणाले की, यावर माझं वैयक्तिक म्हणणं आहे आणि हे मी मोकळेपणानं सांगू इच्छितो की, RSS वर बंदी घालायला हवी. कारण वल्लभभाई पटेल यांनी ज्या गोष्टी आपल्यासमोर ठेवल्या आहेत. या गोष्टींचा जर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा हे आदर करत असतील तर RSS वर बंदी यायलाच हवी. कारण देशात सध्या ज्या काही गडबडी होत आहेत तसंच देशात जो कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे, हे सगळ भाजप आणि RSSच्या वतीनं होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT