Sanjay Raut: संजय राऊतांची प्रकृती अचानक बिघडली! घराबाहेर पडण्यास डॉक्टरांचा मज्जाव; थेट पुढच्या वर्षीच...

Sanjay Raut Health Issue: आपल्या प्रकृतीबाबत नेमकं काय झालंय? हे त्यांनी स्वतः एका निवेदनाद्वारे सांगितलं आहे.
Sanjay-Raut
Sanjay-RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut Health Issue: शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. आपल्या प्रकृतीबाबत नेमकं काय झालंय? हे त्यांनी स्वतः एका निवेदनाद्वारे सांगितलं आहे. पण यात त्यांनी आपण थेट पुढच्या वर्षीच भेटणार असल्याचं म्हटल्यानं खळबळ उडाली आहे.

Sanjay-Raut
Raj Thackrey Politics: ठाकरेंचा ‘ठाकरी’ दणका, सुस्तावलेल्या आयोगानं घेतली मोर्चाची धास्ती; मतदारयादीच्या ‘शुद्धीकरणा’चे आदेश!

संजय राऊत यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं असून यात म्हटलं की,

सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती

जय महाराष्ट्र!

आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. उपचार सुरु आहेत, मी यातून सवकरच बाहेर पडेन.

वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे.

मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या.

कळावे,

उलट सुलट चर्चा

दरम्यान, संजय राऊतांच्या निवेदनात त्यांनी वैद्यकीय कारणास्तव लोकांना भेटता येणार नाही असं म्हटलेलं असलं तरी, त्यांनी नवीन वर्षात मी तुमच्या भेटीला येईल असं म्हटल्यानं त्यांना नेमकं काय झालंय? अशा उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

Sanjay-Raut
Women Scheme : लाडकी बहीण योजनेनंतर महिलांसाठी सरकारची आणखी एक कल्याणकारी योजना! लगेच तपासा पात्रता अन् अर्ज प्रक्रिया !

महापालिकेतील प्रचारात दिसणार नाहीत

आता कोणत्याही क्षणी मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतील. यावेळी प्रचार सभांमध्ये शिवसेनेच्यावतीनं त्यांचे फायरब्रँड नेते आणि भाजपला कायम अंगावर घेणारे नेते म्हणून ख्याती असलेले संजय राऊत दिसणार नाहीत. पण नेमका कुठल्या स्वरुपाचा आजार झालाय किंवा प्रकृती बिघडण्यामागचं कारण त्यांनी नेमकेपणानं सांगितलं नसल्यानं सर्वांच्या मनात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com