Prashant Kishor Bihar Prohibition Sarkarnama
देश

Prashant Kishor : सत्तेत आल्यास तासाभरात दारूबंदी उठवणार, प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

Prashant Kishor Bihar Prohibition : "अवैध दारूच्या धंद्यातून राजकारणी आपला फायदा करून घेत आहेत. आपण गुणवत्तेच्या राजकारणावर विश्वास ठेवतो, त्यामुळे दारूबंदीवर बोलण्यास मागेपुढे पाहणार नाही."

Jagdish Patil

Bihar Politics : बिहारच्या (Bihar) राजकारणात आपलं नशीब आजमावणारे निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. 'जनसुराज पक्ष' सत्तेत येताच एका तासाच्या आत बिहारमधील दारूबंदी उठवणार असल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

माध्यमांशी बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, आमचा पक्ष सत्तेत येताच तासाभरात दारूबंदी उठवू. तर दारूबंदीचा निर्णय हा नितीशकुमार यांचं ढोंग असून नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी लागू केलेली सध्याची दारूबंदी कुचकामी ठरल्याची टीकाही त्यांनी केली.

दारूबंदीमुळे राज्याचा 20 हजार कोटींचा तोटा

तसेच दारूबंदीमुळे राज्याचा 20 हजार कोटींचा तोटा होत असल्याचा दावाही किशोर (Prashant Kishor) यांनी केला. ते म्हणाले, दारूबंदीमुळे अवैध देशी दारूचे विक्री वाढली असून राज्याला 20 हजार कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्क महसुलापासून वंचित रहावं लागत आहे.

शिवाय अवैध दारूच्या धंद्यातून राजकारणी आपला फायदा करून घेत असल्याचा आरोप करत आपण गुणवत्तेच्या राजकारणावर विश्वास ठेवतो, त्यामुळे दारूबंदीवर बोलण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचंही किशोर यांनी स्पष्ट केलं.

40 मुस्लिम उमेदवारांची घोषणा

दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या बिहार (Bihar Election) विधानसभा निवडणुकीत जनसुराज पक्षा 40 मुस्लिम उमेदवारांना तिकीट देणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. त्यामुळे आता बिहारमधील आगामी विधानसभेसाठी प्रशांत किशोर यांनी आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT