Pune News, 15 Sep : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी राज्यात विधानसभेसाठी बारा जागा मागणार असल्याची माहिती दिली. शिवाय भाजप आमदार नितेश राणेंच्या वक्तव्यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पुण्यात एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. यानंतर माध्यमांशी बोलातना अबू आझमी यांनी सर्वधर्मसमभावाची भावना ठेवून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीसोबत असल्याचं स्पष्ट केलं.
अबू आझमी म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या (BJP) धर्मांध राजकारण देशासाठी विघातक आहे. मुस्लिम समाज भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये भीतीच्या वातावरणात जगत असून सर्वधर्मसमभावाची भावना ठेवून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आम्ही महाराष्ट्र विकास आघाडीसोबत आहोत.
पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये समाजवादी पक्षाची ताकद असून या मतदारसंघात उमेदवार उभा केल्यास निश्चितच इथून समाजवादीचा आमदार निवडून येईल. समाजवादी पक्ष हडपसर विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्रात विधानसभेच्या 12 जागा लढवणार आहे.
भारतीय जनता पक्षाने हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण करून देशाला मागे टाकले आहे. समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये चांगली कामगिरी केली त्याचाच परिणाम म्हणून 'चारशे पार'चा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्ष केवळ 240 जागा मिळवू शकला. उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही समाजवादी पक्षाचा मतदार आहे.
आगामी विधानसभा मतदारसंघासाठी मुंबईतील तीन विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्रामध्ये पक्ष 12 जागांवर उमेदवार उभे करणार आहे आणि त्या संदर्भात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झालेली आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, यावेळी त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षातील आमदार नितेश राणे यांच्यासारख्या नेत्यांनी मुस्लिमांविरोधात भूमिका घेऊनही भाजपचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत? याचाच अर्थ त्यांच्या बोलण्यामागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजप आणि आरएसएस असल्याचे दिसून येते.
परंतु मुस्लिम समाज अशी वक्तव्य कदापी सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. प्रत्येक ऍक्शनची एक रिऍक्शन असते, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणे आहे की नितेश राणेंना गप्प करावं, असंही ते अबू आझमी म्हणाले.
मुस्लिम बांधवांचा एमआयएम पक्षावरील विश्वास कमी होत आहे. एमआयएम पक्ष हा केवळ मुस्लिमांचा राजकारणासाठी वापर करून घेतो आणि नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, हे मुस्लिम बांधवांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील लाखो मुस्लिम बांधव हे एमआयएम सोडून समाजवादी पक्षाकडे आकर्षित होत आहे. त्याचा फायदा निश्चितच महाविकास आघाडीला होईल असा विश्वासही अबू आजमी यांनी यावेळी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.