CNG
CNG File Photo
देश

वाढता वाढता वाढे! 'सीएनजी'वर गाडी चालवणंही आता झालं महाग

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे स्वस्त इंधन पर्याय म्हणून वाहनचालकांकडून सीएनजीला (CNG) पसंती दिली जात होती. मात्र, आता सीएनजीवर गाडी चालवणेही महाग झाले आहे. सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल 62 टक्के वाढ केल्याने सीएनजीचा दर सातत्याने वाढत आहे.

सीएनजीच्या दरात दिल्ली आणि परिसरात, हरयाना, राजस्थानमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ उद्या सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहे. यानंतरही इतरही ठिकाणी ही वाढ होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल 62 टक्के वाढ केली आहे. यामुळे सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ सुरू आहे. दिल्लीत सीएनजीचा दर प्रतिकिलो 53.04 रुपयांवर पोचला आहे. यामुळे स्वस्त इंधनाचा पर्याय म्हणून सीएनजीकडे वळणाऱ्या वाहनचालकांना भुर्दंड बसू लागला आहे.

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरातही वाढ सुरू आहे. चालू वर्षात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत 900 रुपयांवर पोचली आहे. दरम्यान, मोदी सरकारने 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली आहे. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनाही दरवाढ थांबवली आहे. महिनाभर पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केलेली नाही. दिल्ली पेट्रोलचा दर दिल्लीत 95.41 रुपये असून, डिझेलचा दर 86.67 रुपये लिटर आहे. मुंबई पेट्रोलचा दर 109.98 रुपये आणि डिझेलचा दर 94.14 रुपये आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT