निलंबनानंतर 24 तासांतच परमबीरसिंहांना पहिला दणका!

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. यानंतर 24 तासांतच त्यांना पहिला दणका बसला आहे.
Param Bir Singh
Param Bir SinghSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांना राज्य सरकारशी पंगा घेणे अखेर महागात पडले आहे. परमबीरसिंह यांच्यासोबत आयपीएस अधिकारी पराग माणेरे (Parag Manere) यांनाही निलंबित करण्यात आले आहे. यानंतर 24 तासांतच परमबीरसिंहांना पहिला दणका बसला आहे.

परमबीरसिंह हे 25 नोव्हेंबरला मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी त्यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सात तासांहून अधिक काळ चौकशी झाली होती. नंतर दुसऱ्या दिवशी ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांची चौकशी करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांची गोरेगावमधील खंडणी प्रकरणात चौकशी करुन जबाब नोंदवला होता. आता याच प्रकरणात त्यांच्या विरोधात आज आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. व्यावसायिक बिमल अगरवाल यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. परमबीरसिंह आणि इतर पाच आरोपींनी अगरवाल यांच्या दोन बारवर छापा न टाकण्यासाठी 9 लाख रुपयांची खंडणी उकळली होती.

Param Bir Singh
निलंबनानंतर परमबीरसिंहांचा बाणेदारपणा अन् नंतर काही तासांतच...

या प्रकरणात परमबीरसिंह यांच्यासोबत बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि आणखी चार आरोपी आहेत. त्यातील सुमितसिंह ऊर्फ चिंटू आणि अल्पेश पटेल यांना अटक करण्यात आली आहे. रियाज भाटी आणि विनयसिंह ऊर्फ बबलू हे फरार आहेत. याच प्रकरणात परमबीरसिंह यांना फरार गुन्हेगार घोषित करण्यात आले होते. मागील आठवड्यात हा आदेश रद्द करण्यात आला होता. सिंह यांच्या विरोधात आणखी चार प्रकरणात आरोपपत्र दाखल व्हायचे आहे. त्यांच्या विरोधातील हे पहिले आरोपपत्र आहे.

Param Bir Singh
कंगनाच्या विरोधात खटला अन् त्यात थेट पंतप्रधान मोदींचे नाव!

पोलिस महासंचालकांकडून पाठवण्यात आलेला निलंबनाचा आदेश स्वीकारण्यास परमबीरसिंह यांनी दिला नकार होता. त्यांनी सेवाज्येष्ठतेचा मुद्दा उपस्थित केला होता. अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचा अधिकारीच आपल्या निलंबनाचा आदेश देऊ शकतो, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. सध्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनू श्रीवास्तव आजारपणाच्या रजेवर आहेत. त्यामुळे निलंबनाचे पत्र हे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडून देण्यात आले होते. निलंबनाचा आदेश स्वीकारण्यावरून बाणेदारपणा दाखवणारे परमबीरसिंह नंतर काही तासांतच नमले. त्यांनी अखेर निलंबनाचा आदेश स्वीकारला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com