Madhya Pradesh Election Sarkarnama
देश

Madhya Pradesh Election : 'ज्या ४० जागांवर हरलो, तिथे विजय मिळवायचाच' ; भाजपचा निर्धार !

Chetan Zadpe

Bhopal News : नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान मध्य प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीची तयारी सूरू असून, भाजपने यामध्ये वेगळी रणनिती आखत आघाडी घेतली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मध्य प्रदेशसह छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम या राज्यांतील विधानसभा निवडणुका होणार आहेत.

या राज्यांच्या निवडणूक तयारीची सर्व सूत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हाती घेतली आहेत. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या ४० जागा भाजपने लक्ष्य केल्या आहेत. या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवण्याचा निर्धार भाजपकडून करण्यात आला. त्यासाठी वेगळी खास रणनिती आखली गेली आहे. (Latest Marathi News)

मध्य प्रदेशातील आगामी निवडणुकीची सूत्रे अमित शहा यांच्याकडे असणार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह राज्यातील सुकाणू समितीच्या नेत्यांबरोबर चर्चा केली आहे. त्यांची ही बैठक सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

या बैठकीमध्ये मागील निवडणुकीत भाजपचा पराभव घडून आलेल्या ४० जागांवर उमेदवारी देण्याबाबत चर्चा झाली. आज (दि. १३ सप्टेंबर) पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत मध्य प्रदेशातील उमेदवार ठरणार असून, त्यांची यादी अंतिम करून जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने सर्वच विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची यादी तयार केली आहे. गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या ४० जागा भाजपने लक्ष्य केल्या आहेत. काहीही करून या जागांवर भाजपने विजय मिळवायलाच हवा, असा ठाम निर्धार भाजपच्या कार्यकर्त्यांनी घ्यावा, असे पक्षाकडून सूचित करण्यात आले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT