CBI and ED  Sarkarnama
देश

Delhi Liquor Scam: दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; 'सीबीआय'कडून 'ईडी'च्या सहाय्यक संचालकाला अटक

CBI and ED : ईडीच्या सहाय्यक संचालकाने मद्यविक्रेत्याकडून पाच कोटींची लाच घेतल्याचा आरोप

सरकारनामा ब्यूरो

Delhi Scam News: दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला असून सीबीआयने सोमवारी ईडीच्या सहाय्यक संचालकांसह इतर सहा अधिकाऱ्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर दिल्ली दारू घोटाळा प्रकरणातील एका आरोपीकडून तब्बल पाच कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे.

ईडीचे सहाय्यक संचालक पवन खत्री यांनी मद्यविक्रेते अमनदीप धल्ल यांच्याकडून पाच कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला असून खत्री यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणामध्ये सीबीआयने ईडीचे सहायक संचालक पवन खत्री यांच्यासह इतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली मद्य घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने सिसोदियांना नवीन बँक खाते उघडून पगार काढण्याची परवानगी दिली होती. तर सीबीआय व ईडी या तपास यंत्रणांनी सिसोदियांवर दिल्ली मद्य घोटाळ्याचे आरोप केलेले आहेत.

आता दिल्ली मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात सीबीआयकडून इडीच्या सहाय्यक संचालकांसह सहा अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्यामुळे दिल्ली मद्य घोटाळ्यात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय माहिती समोर येते, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT