Mumbai News: अंगडिया खंडणी प्रकरणात अडचणीत आलेले आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांना मोठा दिलासा मिळाला असून राज्य सरकारने त्यांना पुन्हा सेवेत पुनर्स्थापित केले आहे. आता सौरभ त्रिपाठी यांची राज्याच्या गुप्तचर विभागात पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून सोमवारी त्रिपाठी यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले.
खंडणी वसूल केल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचे महाविकास आघाडी सरकारच्या काळात निलंबन करण्यात आले होते. अंगडिया खंडणी प्रकरणी सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. थेट आयपीएस अधिकाऱ्याचे नाव खंडणी प्रकरणात आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती.
सौरभ त्रिपाठींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते बेपत्ता झाले होते. त्यानंतर अटकेपासून वाचण्यासाठी त्रिपाठी यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेत त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते.
यानंतर काही दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने सौरभ त्रिपाठी यांचे निलंबन मागे घेत त्यांना दिलासा दिला होता.आता सौरभ त्रिपाठी यांना राज्य सरकारने मोठा दिलासा देत त्यांची थेट राज्याच्या गुप्तचर विभागात पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती केली आहे.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.