Canada - India - America  Sarkarnama
देश

Canada vs India : भारत-कॅनडा वादात अमेरिकेची उडी; गुप्तचर एजन्सी 'एफबीआय'ने केली थेट पुरावे सादर करण्याची मागणी

Ganesh Thombare

Delhi News : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येच्या प्रकरणावरून भारत आणि कॅनडात तणाव वाढला आहे. हरदीपसिंग निज्जरच्या मृत्यूमागे भारताच्या गुप्तचर संस्थेचा हात असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला होता. मात्र, भारताने कॅनडाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

आता भारत आणि कॅनडाच्या वादात अमेरिकेनी उडी घेतली असून, या प्रकरणात अमेरिकेन गुप्तचर एजन्सी 'एफबीआय' अचानक सक्रिय झाली आहे. अमेरिकेन गुप्तचर एजन्सी 'एफबीआय'ने या प्रकरणातील सर्व माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याकडे या प्रकरणातील केलेल्या आरोपाचे पुरावे मागितले आहेत.

कॅनडाने भारतीय एजंटनेच हरदीपसिंग निज्जरची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पण आतापर्यंत याबाबत कुठलाच पुरावा कॅनडाने सादर केलेला नाही. या प्रकरणावरून भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. आता अमेरिकेने याबाबतचा पुरावा सादर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे यावर कॅनडा काय भूमिका घेतं, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

पंतप्रधान जस्टिन यांनी भारतावर केलेल्या आरोपानंतर आता कॅनडा येथील अमेरिकेच्या राजदूताने त्यांच्याकडे या प्रकरणाचे पुरावे मागितले आहेत. अमेरिकन गुप्तचर एजन्सी 'एफबीआय'ने या प्रकरणातील माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.

त्यासोबतच 'एफबीआय'कडून काही दहशतवाद्यांची या प्रकरणात चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. त्यासोबतच काही दहशतवादी संघटनेकडून माहिती मिळते का ? याचीही चाचपणी होण्याची शक्यता आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT