India Vs Canada : भारताचा कॅनडाला सज्जड दम; दहशतवादी कारवाया थांबत नाहीत, तोपर्यंत 'या' मोठ्या करारावर चर्चा नाही

Narendra Modi Warns Justin Trudeau : ट्रुडो यांचे खलिस्तानी प्रेम वाढत असल्याने मतभेदात भर
Justin Trudeau, Narendra Modi
Justin Trudeau, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : कॅनडातून होत असलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याकडे चिंता व्यक्त केली होती. यावर काही तरी मार्ग निघेल असे वाटत असताना कॅनडाकडून दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कॅनडा आपल्या भूमीतून भारतविरोधी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत त्याच्याशी मुक्त व्यापार करारावर चर्चा केली जाणार नाही, असा इशारा भारताने दिला आहे. यामुळे उभय देशांतील संबंध आणखी ताणण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Latest Political News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

खलिस्तानी मुद्द्यावरून भारत आणि कॅनडा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मोठी दरी निर्माण झाली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या कार्यकाळात अनेक खलिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय वंशाच्या नागरिकांवर हल्लेही केले होते. त्यावर भारतानेही टीका केली होती. ट्रुडो यांचे खलिस्तानी प्रेम वाढत असल्याची टीका होत आहे. परिणामी भारत आणि त्यांच्या संबंधांमधील अंतरही वाढताना दिसत आहे.

Justin Trudeau, Narendra Modi
Women Reservation News : कोल्हापूर-सांगलीत होणार 5 महिला आमदार ? ; प्रस्थापितांची वाढली धाकधूक

जी २० शिखर परिषद संपल्यानंतर, ट्रुडो यांनी दोन्ही देशांतील संबंध सुधारावेत म्हणून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले, 'आम्हाला हिंसा आणि द्वेष संपवायचा आहे. त्यामुळे दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सुधारतील, अशी आशा असताना कॅनडाकडून परस्परविरोधी भूमिका घेतली जात आहे. कॅनडा आपल्या भूमीतून भारतविरोधी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत त्याच्याशी मुक्त व्यापार करारावर चर्चा केली जाणार नाही, असा इशारा भारताने कॅनडाला दिला आहे.

दोन्ही देशांमध्ये सुमारे दशकभरानंतर 'एफटीए'वर चर्चा सुरू होणार होती. मात्र, भारताकडून हे विधान आल्यानंतर कॅनडाने पुढील महिन्यात भारतभेटीत होणारे करार तूर्तास स्थगित केले आहेत. या वर्षाच्या फेब्रुवारी-मार्च महिन्यांतही कॅनडा-भारत यांच्यात तणाव निर्माण झाला होता. भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर फुटीरवादी आणि अतिरेकी विचारधारेच्या लोकांनी निदर्शने केली होती. या घटनेचाही भारताने तीव्र निषेध केला होता. (Maharashtra Political News)

या घटनेनंतर भारतीय परराष्ट्र खात्याने कॅनडाच्या उच्चायुक्तांना समन्स बजावून भारताच्या शासकीय कार्यालयांबाहेर केलेल्या निदर्शनांचा निषेध व्यक्त केला होता. त्यामुळे आता आगामी काळात हे दोन्ही देशांतील ताणलेले संबंध सुधारण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार, याकडे जगाचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Justin Trudeau, Narendra Modi
Women Reservation Bill : महिला आरक्षणावरून प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला डिवचलं; म्हणाले, "ओबीसींची एवढी बाजू घेता तर..."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com