Karnataka VidhanSabha Election Result 2023 :  Sarkarnama
देश

Karnataka Assembly Elections Result 2023 Live : 50 जागांच्या निकालाकडे लक्ष; भाजपला अजूनही आशा

Karnataka Assembly Elections live News : काँग्रेस 118 जगांवर आघाडीवर आहे.

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Assembly Elections Result : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस 118 जगांवर आघाडीवर आहे. तर भाजप (BJP) 76 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएस (JDS) 24 जगांवर आघाडीवर दिसत आहे.

ही आकडेवारी असली तरी कर्नाटकमध्ये 50 जागांवर अटितटीची लढत आहे. त्यामुळे या 50 जागांपैकी किती जागा कोणत्या पक्षाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये अगदी 60 ते 1000 मतांचे अंतर आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये या जागांवर काटेकी टक्कर सुरु आहे. त्यामुळे कर्नाटच्या निकालाकडे दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे लक्ष आहे. आतापर्यंत झालेल्या मत मोजणीमध्ये काँग्रेसला (Congress) 43.2 टक्के, भाजपला 36 टक्के आणि जेडीएसला 13 टक्के मते मिळत आहेत.

चिकनायकनहल्ली जेडीएसचे उमेदवार 21 मतांनी आघाडीवर आहेत. हदगल्ली मतदारसंघात काँग्रेस 60 मतांनी आघाडीवर आहे. नरगुंड मतदारसंघात भाजप 85 मतांनी आघाडीवर आहे. पुत्तूर मध्ये अपक्ष उमेदवार 91 मतांनी आघाडीवर आहे. तर रायचूर काँग्रेस उमेदवार 95 मतांनी आघाडीवर आहे. सिरसीमध्ये भाजप उमेदवार 117 मतांनी आघाडीवर आहे. सिंदगीमध्ये भाजप उमेदवार 121 मतांनी आघाडीवर आहे. निपानीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदार आता ३०० मतांनी आघाडीवर आहेत. ही आकडेवारी प्रत्येक फेरीमध्ये बदलत आहे.

दरम्यान, काँग्रेसने स्पष्ट बहुमत गाठले आहे. त्यामुळे निवडून आलेल्या आमदारांची फोडाफोडी होऊ नये याची पुरेशी काळजी काँग्रेसकडून घेण्यात येत आहे. निवडून आलेल्या सर्वच आमदारांना बंगलोरकडे रवाना करण्यात येणार असून तिथून जयपूरला हलवले जाण्याची शक्यता काँग्रेसच्या सूत्राने व्यक्त केली आहे. आमदारांची संपूर्ण जबबादारी ही डीके शिवकुमार यांच्याकडे देण्यात आली आहे.

काँग्रेसने रिसॉर्टबी बुक केल्याची माहीत मिळत आहे. त्याच प्रमाणे कर्नाटकच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आमदारांना घेऊन जाण्यासाठी सुविधा उपलब्ध केल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीमध्ये कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेस काळजी घेत आहे. त्यासाठी त्यांनी विजयी उमेदवारांना सध्याकाळ पर्यंत बंगळुरुमध्ये येण्याचे सांगितले आहे. तेथून त्यांना जयपूरमध्ये नेणार असल्याचे समजत आहे. मात्र, सध्या काँग्रेसचे आकड्यांवर लक्ष आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशभरात जल्लोष सुरु केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT