Karnataka Election Result : निपाणीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव पाटील आघाडीवर

बेळगाव दक्षिणमधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार, तर निपाणीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तमराव पाटील हे आघाडीवर गेले आहेत.
ncp
ncpsarkarnama

बंगळूर : बेळगाव दक्षिणमधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार, तर निपाणीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तमराव पाटील हे आघाडीवर गेले आहेत. सुरुवातीच्या कलामध्ये राष्ट्रवादीचे पाटील आघाडीवर होते. मात्र, काही फेऱ्यात ते पिछाडीवर गेले होते. आता ते पुन्हा ते आघाडीवर गेले आहेत. (Uttamrao Patil of NCP is leading from Nipani)

भाजपच्या शशिकला जोल्ले, काकासाहेब पाटील, उत्तमराव पाटील आणि जयराम मिरजकर यांच्यात चौरंगी लढत झाली होती. त्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार उत्तमराव पाटील आघाडीवर आहेत. तर भाजपच्या शशिकला जोल्ले या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांमध्ये अवघ्या शेकड्यांचा फरक आहे. पहिल्या टप्प्यात आघाडीवर असलेले उत्तमराव पाटील हे मध्यंतरी पिछाडीवर गेले होते. त्यानंतर आता पाटील हे आघाडीवर आले आहेत.

ncp
Karnataka Election Result : भाजपतून काँग्रेसमध्ये आलेले जगदीश शेट्टार पिछाडीवर, तर लक्ष्मण सावदी आघाडीवर; भाजपचा बडा नेताही पिछाडीवर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीत सभा घेतली होती. त्या ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होत. साडेतीन जिल्ह्याचा पक्ष कर्नाटका काय करणार, असा सवाल करत या पक्षाला येथून हाकलून द्या, असे आवाहन त्यांनी केले होते. त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार हे उत्तमराव पाटील यांच्यासाठी मैदानात उतरले होते. त्या ठिकाणी सभा घेत पवारांन फडणवीसांना सडेतोड उत्तर दिले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मतदानादरम्यान निपाणीत तळ ठोकला हेाता.

ncp
Karanataka Election Result : काँग्रेस ११० जागांवर आघाडीवर भाजपची पिछेहाट; कुमारस्वामी किंगमेकरच्या भूमिकेत?

बेळगाव दक्षिणमधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार हे आघाडीवर गेले आहेत. त्यामुळे आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. समितीने बेळगाव जिल्ह्यातील सर्व जागांवर एकच उमेदवार देत निवडणूक लढवली आहे. मात्र, ते सर्व पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ncp
Prakash Ambedkar : आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून आंबेडकरांचा ठाकरेंना सल्ला; म्हणाले, "महिन्यानंतर..."

मतदारसंघ...............पक्षनिहाय उमेदवार................ कल

शिग्गांव .........बसवराज बोम्मई (भाजप).... आघाडीवर

वरुणा.........सिद्धारमय्या (काँग्रेस)........ आघाडीवर

कनकपुरा...… डी. के. शिवकुमार (काँग्रेस) ....आघाडीवर

चन्नापट्टन...… एचडी कुमारस्वामी (जेडीएस).....आघाडीवर

चिकमंगळूर........सीटी रवि (भाजपा).............. पिछाडीवर

अथणी......… लक्ष्मण सावदी (काँग्रेस) ............आघाडीवर

हुबळी–धारवाड सेंट्रल........ जगदीश शेट्टार (काँग्रेस) ..... पिछाडीवर

सिरसी........... विश्वेश्वर हेगड़े कागेरी (भाजपा) ..........आघाडीवर

शिकारीपूर............ बीवाई विजयेंद्र (भाजपा)..............आघाडीवर

चित्तपुर................ प्रियांक खर्गे (काँग्रेस) .................आघाडीवर

होलेनरसीपुर..........एचडी रवन्ना (जेडीएस)................ आघाडीवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com