Income Tax Raid Sarkarnama
देश

Income Tax Raid : दुकान चपलांचं, पण सोफा, बेड, पिशव्या भरून नोटांचे बंडल; IT अधिकाऱ्यांचे डोळे फिरले

Agra Income Tax : व्यावसायिकांचे सर्व व्यावहार हे रोखीने चालतात. यासाठी कंपनीने 'परची सिस्टीम'चा वापर केल्याचे समोर आले. स्लिपच्या माध्यमातून हिशेब ठेवला जात होता. त्यातून कर चुकवून सरकारची फसवणुकीचा आरोप आयकर विभागाने केला.

Sunil Balasaheb Dhumal

Crime News : चपलांचा व्यावसाय करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. त्यावेळी घरातील कानाकोपऱ्यात ठेवलेले नोटांचे बंडल जप्त केले. या रकमेची मोजणी करण्यासाठी सहा मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून मोजणी सुरू आतापर्यंत आहे. आतापर्यंत आयकर विभागाने 53 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे आयकर विभागाने ही कारवाई केली आहे. ऐन लोकसभेत झालेल्या या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. Income Tax Raid

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आग्रात आयकर विभागाने केलेल्या कारवाईतील सर्व व्यापाऱ्यांचे व्यावहार हे रोखीने चालतात. हे व्यवहार 'परची सिस्टीम'च्या माध्यमातून करण्यावर ते भर देतात. याचा सर्व हिशेब स्लिपच्या माध्यमातून ठेवला जातो. हे व्यापारी अधिकृत बिल न करता व्यापारी सरकारची कर चुकवून फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले. यातूनच आयकर विभागाने Income Tax या व्यापाऱ्यांच्या घरांवर छापा टाकला. त्यावेळी अधिकाऱ्यांनी बेड, सोफा आणि घरभर ठेवलेल्या पिशव्यांतून नोटांचे बंडल हस्तगत केले.

चपलांच्या व्यवसायात स्लिपद्वारे रोख रक्कम दिली जाते. मात्र कानपूरमध्ये ७ मे रोजी मतदान असल्याने स्लिप्सची कॅश करता आल्या नाहीत आणि त्या आयकर विभागाच्या नजरेत आल्या. निवडणुकीनंतर, स्लिप्सची पूर्तता करण्यात येणार असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली. त्यानुसार अधिकाऱ्यांना तात्काळ पावले उचलत कारवाई केली. या छाप्यात स्लिपच्या माध्यमातून होणारी कर फसवणूक उघडकीस आली आहे.

आयकर विभागाच्या टीमने छापेमारीच्या ठिकाणी टेंट हाऊस, गाद्या, बेडशीट, पैसे मोजण्याचे यंत्र आदी साहित्य मागवले आहे. त्या तंबूतच अधिकाऱ्यांनी रविवारी रात्रभर नोटा मोजण्याचे काम केले. आता काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्यात रिअल इस्टेट आणि जमिनीच्या मोठमोठ्या व्यवहारांची माहिती पुढे आलेली आहे. यानंतर अधिकाऱ्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांसह सहा नोट मोजणी यंत्रे मागवले आणि पुढील रक्कम मोजणीचे काम सुरू ठेवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत बुटांचा व्यवसाय उधारीवर चलतो. यातील लहान-मोठे व्यापारी तत्काळ पैसे देण्याऐवजी छोट्या व्यावसायिकांना स्लिप देतात. त्या स्लिप्सवर तारीख आणि कालावधी लिहलेला असतो. तसेच देय तारखेला स्लिप जमा करणाऱ्या छोट्या व्यावसायिकास मोठ्या व्यापाऱ्याकडून पैसे दिले जातात. हे संपूर्ण काम दोन नंबरच्या म्हणजेच काळा बाजाराच्या स्वरुपात चालते. हा सर्व प्रकार कर चुकवण्यासाठीच केला जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT