Arvind Kejriwal Death Threat : 'दिल्ली सोडून जा अन्यथा...', अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी

AAP Vs BJP : . केजरीवाल यांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे कृत्य भाजपकडून केले जात असण्याची शक्यता आहे, असे आपचे खासदार संजय सिंह यांनी म्हटले आहे.
 Arvind Kejriwal Death threat
Arvind Kejriwal Death threatsarkarnama
Published on
Updated on

Political News : कथित मद्य धोरण आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगातून जामीनावर असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भाजपला टार्गेट केले आहे. आपल्या जाहीर सभांमधून ते भाजला पराभूत करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, जामीनावर असलेल्या केजरीवाल यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा संदेश मेट्रो स्टेशनमध्ये लिहला आहे. या संदेशाचा फोटो आप आदमी पक्षाने आपल्या ट्विटरवर शेअर करत नरेंद्र मोदी Narendra Modi, भाजप आणि पंतप्रधान कार्यालयाच्या इशाऱ्यावरून ही धमकी दिल्याचे म्हटले आहे.

 Arvind Kejriwal Death threat
Mumbai Election Voting Updates : मतदान न करणाऱ्यांचा टॅक्स वाढवा! परेश रावल यांनी सुचवली शिक्षा

आम आदमी पक्षाच्या AAP ट्विटमध्ये म्हटले आहे की, पीएमओ, भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या इशारावर राजीव चौक, पटेल नगर मेट्रो स्टेशनवर लिहिलेली धमकी. अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांनी काही जरी झाले तरी त्याला भाजप आणि नरेंद्र मोदी जबाबदार असतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपचे खासदार संजय सिंह यांनी धमकीच्या प्रकारणावरून भाजप, पंतप्रधान मोदींना टार्गेट केले आहे. केजरीवाल यांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे कृत्य भाजपकडून केले जात असण्याची शक्यता आहे. याआधीही भाजपाने केजरीवाल यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे, ही पहिली वेळ नाही. मेट्रो स्थानकावर धमक्या लिहिल्या गेल्या आहेत. पंतप्रधान कार्यालय आणि स्वतः पंतप्रधानांच्या इशाऱ्यावर या धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप संजय सिंह यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com