Income Tax New Rules Sarkarnama
देश

Income Tax New Rules: पगारदारांसाठी महत्वाची बातमी! 1 एप्रिलपासून 'फॉर्म 16' बंद, 'फॉर्म 130'ची एन्ट्री, टॅक्सचा हिशेब पूर्णपणे बदलणार

Form 16 Closed from 1 April: १ एप्रिलपासून फॉर्म 16 ऐवजी फॉर्म 130 असणार आहे, त्याचा पगारदारांना फायदा की फटका याची माहिती वाचा.

Mangesh Mahale

मार्च महिना जवळ आला की इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पगारदाराची धावपळ सुरु होते. 'टॅक्स सेव्हिंग' आणि 'डॉक्युमेंट्स' गोळा करण्याासाठी जुळवाजुळव सुरु असते. पण आता यातून लवकरच सुटका होणार आहे. करप्रणाली अधिक पारदर्शक आणि सोपी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.

नोकरदारांना मिळणारा आता 'फॉर्म 16'मध्ये बदल होणार आहे. त्याऐवजी एक नवीन आणि स्मार्ट फॉर्म असणार आहे. तो फॉर्म काय आहे. याबाबत माहिती जाणून घेऊया, आगामी आर्थिक वर्षापासून, म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून पगार आणि टॅक्सचा हा हिशेब पूर्णपणे बदलणार आहे. कारण आता फॉर्म 16' ऐवजी 'फॉर्म 130' असणार आहे.

किती टीडीएस (TDS) कापला जातो, हा महत्वाचा पुरावा म्हणजे म्हणजे फॉर्म 16 होता, पण येत्या 1 एप्रिलपासून हा फॉर्म बंद होणार आहे, 'फॉर्म 130' (Form 130) भरणे बंधनकारण आहे.

फॉर्म 16 हा नोकरदारांची कंपनी, संस्थेकडून मिळणार नाही, तर तो थेट केंद्र सरकारच्या 'TRACES' पोर्टलवरून डाऊनलोड करावा लागेल. यामुळे चुकांना वाव राहणार नाही आणि फसवणुकीचे प्रकारही थांबतील, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नव्या नियमांनुसार,

  • सर्व अर्ज ITR-1 ते ITR-7 पर्यंतचे आता नव्या रूपात असतील.

  • उत्पन्नाच्या प्रत्येक स्रोताची माहिती अधिक सविस्तरपणे द्यावी लागेल

  • प्री-फिल्ड फॉर्म्स. तुमचा बराचसा डेटा आता आधीच भरलेला असेल.

  • पगार, बँक व्याज आणि इतर उत्पन्न एकाच ठिकाणी दिसेल

  • माहिती अचूक असल्यास तुमचा टॅक्स रिफंड (Tax Refund) देखील आता अधिक वेगाने तुमच्या खात्यात जमा होईल.

काय आहे फॉर्म 130

तीन विभागात हा फॉर्म असेल.

  • भाग अ (Part A): कंपनीची (नियोक्ता) संपूर्ण माहिती असेल.

  • भाग ब (Part B): एकूण पगार आणि कापलेल्या टीडीएसचा (TDS) सारांश असेल.

  • भाग क (Part C): पगाराचा पूर्ण ब्रेक-अप (Basic, HRA, Allowances) आणि गुंतवणुकीची (Deductions) सविस्तर गणना असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT