Mamata Banerjee ED Summons Sarkarnama
देश

Mamata Banerjee ED Summons : मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ; खासदार भाच्याला ईडीचे समन्स!

Chief Minister Mamata Banerjee's ED Action : "पक्षाच्या मोठ्या कार्यकमाच्या दिवशीच चौकशीला येण्याचे आदेश..."

Chetan Zadpe

Kolkata News : भाजप विरोधकांमधील एक प्रमुख चेहरा असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने त्यांचे भाचे व तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जींना (Abhishek Banerjee) ३ ऑक्टोबरला सकाळी १०.३० वाजता चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. शिक्षक भरती प्रकरणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत असून, त्याप्रकरणी त्यांना ईडीने समन्स बजाविले असल्याचे समजते. (Latest Marathi News)

ईडीने या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव असलेले अभिषेक बॅनर्जी यांना शिक्षक भरती घोटाळ्यातील भ्रष्टाचार प्रकरणी समन्स बजावले आहे. यापूर्वी १३ सप्टेंबरला अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावले होते. या वेळी त्यांची ईडीसमोर सुमारे नऊ तास चौकशी झाली होती. त्यामुळे आता या चौकशीला अभिषेक बॅनर्जी सामोरे जाणार की नाही? याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ईडीकडून समन्स बजावल्यानंतर याबाबत अभिषेक बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर ट्विट केले आहे. त्यामध्ये अभिषेक बॅनर्जीने म्हटले आहे की, यापूर्वी मला ईडीकडून समन्स बजाविण्यात आले होते. त्यामध्ये माझे कर्तव्य बजावत मी हजर होऊन मला दिलेल्या समन्सचे पालन केले. आता आज पुन्हा एकदा त्यांनी मला दुसरे समन्स पाठवले आहे."

"ज्या दिवशी पश्चिम बंगालच्या न्याय हक्कासाठी ३ ऑक्टोबरला दिल्लीत आंदोलन होणार आहे. त्या दिवशी हजर राहण्यास सांगितले आहे. यामुळे स्पष्टपणे जाणवत आहे की, केंद्र सरकार खरोखर चिंताग्रस्त, व्यथित आणि घाबरलेले आहे. त्यामुळे मला नोटीस बजवाली आहे," असेही ते म्हणाले. त्यामुळे आता अभिषेक बॅनर्जी आता चौकशीला सामोरे जाणार का नाही, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT