Narendra Modi at Red Fort Sarkarnama
देश

PM Narendra Modi : भारत, संविधान की शेतकरी..! भाषणाचा विक्रम मोडताना मोदींचा कोणत्या शब्दांवर होता भर? जाणून घ्या...

Independence Day Red Fort : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर भाषण करताना सर्वच घटकांचा उल्लेख करत विकसित भारताचा पुन्हा एकदा नारा केला.

Rajanand More

New Delhi : देशभरात 78 वा स्वातंत्र्य दिन गुरूवारी उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद मोदींनी सलग 11 व्यावर्षी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणाने त्यांचाच विक्रम मोडला. गुरूवारी त्यांचे भाषण तब्बल 98 मिनिटे चालले. सकाळी 7.33 वाजता सुरू झालेले भाषण 9.11 वाजता संपले.

मोदींनी भाषणादरम्यान विकसित भारताच्या उद्दिष्टावर अधिक भर देताना देशाने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचाही आढावा घेतला. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेला हल्ला, महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, घराणेशाही, संविधान, दलित तसेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूं मिळवलेल्या पदकांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

आपल्या भाषणात मोदींनी देश हा शब्द सर्वाधिक 61 वेळा उच्चारला. त्यानंतर भारत 59 वेळा आणि देशवासी हा शब्द 45 वेळा उच्चारला. त्यांच्या भाषणामध्ये युवकांवरही भर होता. त्यामुळे युवा हा शब्द ते 43 वेळा बोलले. त्याचप्रमाणे महिला सुरक्षेवर बोलताना त्यांनी महिला या शब्दाचा 20 वेळा उल्लेख केला. स्वातंत्र्य, सुरक्षा आणि विकसित भारत हे शब्द प्रत्येकी 16 वेळा आले.

लोकसभा निवडणूक तसेच निकालानंतर संविधानावरून विरोधक व सत्ताधारी आमनेसामने आले होते. पंतप्रधानांनी आजच्या भाषणात संविधान या शब्दाचा उल्लेख आठवेळा केला. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर आसूड ओढताना त्यांनी या शब्दांचा अनुक्रमे 13 व 5 वेळा उल्लेख केला. समान नागरिक संहितेवरही त्यांनी भर दिला होता. त्यामुळे त्यांच्या भाषणात यूसीसीचा पाचवेळा उल्लेख झाला. 

कोणता शब्द कितीवेळा बोलले?

देश (61), भारत (59), देशवासी (45), युवा (43), विश्व (34), स्वप्न (28), सुधारणा (23), महिला (20), सरकार (18), शेतकरी (17), विकसित भारत, शिक्षण, राज्य, स्वातंत्र्य, सुरक्षा (प्रत्येकी 16), 2047, भ्रष्टाचार (प्रत्येकी 13), मध्यमवर्ग व 40 कोटी (प्रत्येकी 11), दलित, यूसीसी, रोजगार (प्रत्येकी 6), संविधान, एसटी, बजेट (प्रत्येकी 8), तिरंगा, घराणेशाही (प्रत्येकी 5).

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT