INDIA leaders, Sharad Pawar Sarkarnama
देश

INDIA LokSabha Seat: 'इंडिया'तील जागा वाटपाचा तिढा सुटणार; बुधवारी फॉर्म्युला ठरण्याची शक्यता

Sunil Balasaheb Dhumal

Delhi Political News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून सुरू आहे. इंडिया आघाडीच्या मुंबईतील तिसऱ्या बैठकीत ठरल्यानुसार आता जागा वाटपाची चर्चा १३ सप्टेंबरला शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे. सर्वच राज्यांतील जागा वाटपचा फॉर्म्युला या बैठकीतून ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटपसंदर्भातील शिवधनुष्य पेलण्याचे आव्हान आघाडीसमोर असणार आहे. त्यासोबतच सर्वच पक्षांना एकत्रित ठेवण्याची कसरत करावी लागणार आहे. (Latest Political News)

इंडिया आघाडीच्या जागा वाटपाबाबतची चर्चा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी १३ सप्टेंबर रोजी होत आहे. विशेषतः उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला १८ ते २० जागा हव्या आहेत, तर अखिलेश यादव एवढ्या जागा सोडण्यास तयार नाहीत. दुसरीकडे समाजवादी पक्षाच्या कोठ्यातील एक जागा चंद्रशेखर रावण यांनाही हवी आहे. ती ही जागा सोडण्यास समाजवादी पक्षाने नकार दर्शवला आहे. त्यासोबतच अन्य पक्षाच्या जागा वाटपाबाबत या ठिकाणी चर्चा होणार आहे.

बिहारमध्ये काँग्रेसला लालूप्रसाद यादव आणि नितेश कुमार यांच्याकडून दहा जागा हव्या आहेत, तर दुसरीकडे हे दोन्ही पक्ष काँग्रेसला सहा जागा देण्यास तयार आहेत. दिल्ली आणि पंजाबमध्ये काँग्रेस व आम आदमी पक्षात दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे आम आदमी पक्षाला दिल्ली, पंजाबच्या बदल्यात गुजरातमध्ये जागा हव्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेणे कठीण जात आहे.

महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसला अधिक जागा हव्या आहेत. महाराष्ट्रात तीन पक्षांची आघाडी असताना काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता, तर आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे चित्र बदलले आहे, तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षसोबत अनेक पक्षांना जागा वाटपाबाबत कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT