Jalna News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी संभाजी भिडे यांनी भेट घेतली. सध्याचे सत्ताधारी चांगले असून, ते आरक्षणाबाबत सकारात्मक विचार करतील, असे सांगून भिडेंनी जरांगेंना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. तुमच्या लढ्याला आम्ही शेवटपर्यंत पाठिंबा देणार असल्याचा शब्दही भिडेंनी दिला. भिडेंच्या भेटीमुळे आता आंदोलनाला यश येईल, असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला. (Latest Political News)
सत्ताधाऱ्यांवर विश्वास ठेवून उपोषण मागे घेण्याचे आवाहन भिडेंनी केले. "ही लढाई झट की पट आणि एक घाव दोन तुकडे अशी नाही, पण तुमचा आग्रह सत्य आहे. आपण मोठ्या मत्सेद्देपणाने हे उपोषण थांबवूया. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुमच्या सुरू असलेल्या लढ्याला पाठिंबा आहे. आरक्षणाचा हा लढा सुरू ठेवा, पण उपोषण थांबवा. जिजाऊ माऊलींचा निरोप आहे, असे समजून तुम्ही शिवरायांच्या पायाशी हात ठेवून आंदोलन थांबवावे," अशी विनंती Sambhaji Bhide भिडेंनी जरांगे यांना केली.
भिडेंनी भेट दिल्यानंतर या आंदोलनाला यश येणार असल्याचा विश्वास (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला. मात्र, आंदोलन मागे घेण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. जरांगे म्हणाले, "हे आंदोलन सामाजिक असल्याने सर्व स्तरातील लोक येऊन भेट, पाठिंबा देतात. लोकशाही असल्याने आम्ही सर्वांशीच चर्चा करण्यास तयार आहोत. आज संभाजी भिडे गुरुजी यांनी आंदोलनाला भेट दिली हे आमचे यश आहे."
"संभाजी भिडे सहसा कुठेही भेट देत नाहीत किंवा कुठल्याही मुद्द्यावर बोलत नाहीत. त्यांना मी थेट कधी भेटलो किंवा बोललो नव्हतो. त्यांना आम्ही गडकिल्ल्याच्या कामातून धर्माच्या कामातून ओळखतो. त्यांची वाट हिंदू धर्माचे रक्षण आणि देवधर्माचे रक्षण करण्यासाठी आहे. आता गुरुजी आल्याने आंदोलनास शंभर टक्के यश मिळणार यात काही शंका नाही. ते येणेच आमच्यासाठी मोठे आहे. ते आले हेच आमच्यासाठी मोठे आहे," असा विश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केला.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.