NDA VS INDIA : समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन Jaya Bacchan आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यातील खडाजंगीनंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बच्चन यांच्यावर केलेल्या टिप्पणीवर विरोधक धनखड यांच्याविरोधात एकवटले आहेत. ते धनखड यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव राज्यभसेत आणण्याच्या तयारीत आहेत.
या प्रस्तावासाठी आतापर्यंत इंडिया आघाडीतील 87 खासदारांनी स्वक्षऱ्या केल्या आहेत. हा प्रस्ताव अधिकृतपणे सभागृहात मांडला गेला तर हा एनडीए सरकारला इतिहासात पहिला मोठा धक्का असेल, अशी चर्चा सुरू झालेली आहे.
राज्यसभेत इंडिया आघाडीचे INDIA Alliances 87 सदस्य आहेत. मात्र या प्रस्तावावर काँग्रेसच्या 4 ते 5 सदस्यांनी सही केल्या नाहीत. त्यामुळे या प्रस्तावावरील काही सह्या या बाहेरील सदस्यांच्या असण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसच्या एका खासदाराने स्पष्ट केले. दरम्यान, शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब करण्यात आलेले आहे.
जया बच्चन यांच्या वादानंतर राज्यसभेच्या सभागृहाचा विरोधकांनी त्याग केला. त्यानंतर विरोधकांनी सभागृह नेते जे. पी नड्डा यांना विरोधी पक्ष धनखड यांना हटवण्यासाठी प्रस्ताव आणण्याच्या विचारात असल्याची अनौपचारिक माहिती दिली होती.
दरम्यान, धनखड आणि विरोधकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. इंडिया आघाडीच्या नोटीसमध्ये, अध्यक्ष कसे पक्षपाती आहेत, यावर प्रकाश टाकणार आहेत. आता हा प्रस्ताव कधी मांडला जाणार हे अद्याप ठरलेले नाही, असेही काँग्रेसकडून सांगण्यात आले.
काँग्रेस Congress नेते अजय माकन म्हणाले की, विरोधी पक्षांना वाटते की अध्यक्षांचा दृष्टिकोन पक्षपाती आहे. राज्यसभा हे असे सभागृह आहे जे इतर विधानमंडळांसाठी मापदंड ठरवते. त्या सभागृहात अध्यक्षांना पक्षपातीपणे पाहिले जाऊ नये. एकट्या काँग्रेसला असे वाटत नाही, सर्व विरोधी पक्षांना त्यांचे वागणे एका बाजूने पक्षपाती वाटते. यातूनही विरोधकांनी त्यांच्याविरोधात मोहीम हाती घेतल्याचे बोलले जात आहे.
अशी असते उपराष्ट्रपतींना हटवण्याची प्रक्रिया..
उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यांना हटवण्यासाठी राज्यसभेत बहुमताने ठराव मंजूर करावा लागतो. प्रस्ताव आणण्याच्या 14 दिवस आधीच नोटीस द्यावी लागते. त्यानुसार या प्रस्तावाच्या बाजूने आता स्वाक्षऱ्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर रीतसर सादर करण्यासाठी विरोधकांना आपली एकजूटीने पूर्ण ताकद दाखवावी लागणार आहे.
राज्यसभेतील बलाबल?
सध्या राज्यसभेत 225 सदस्य असून भाजपच्या ८६ सदस्यांसह एनडीएकडे 101 खासदार आहेत. इंडिया आघाडीचे 87 सदस्य आहेत. तर उर्वरीत वायएसआरसीपीचे 11, बीजेडी 8 तर अण्णाद्रमुक 4 सदस्य आहेत. प्रस्तावासाठी उर्वरीत सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
आता 3 सप्टेंबर रोजी राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यात भाजपला किमान 10 जागा असून त्यांची संख्या 96 तर एनडीएची ताकद वाढून 111 खासदार होतील. हे 12 सदस्य वाढल्यानंतर राज्यसभेत 237 सदस्य होणार आहेत. त्यामुळे विरोधकांना बहुमतासाठी 119 चा आकडा पार करावा लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.