Tanaji Sawnat News : पालकमंत्री सावंतांचा तीन माजी आमदारांना 'जोर का झटका'; शिवसेना शिंदे गटात नेतेमंडळींचा प्रवेश

Political News : परंडा विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीत पालकमंत्री तानाजी सावंत विरुद्व माजी आमदार राहुल मोटे अशी लढत होण्याची शक्यता आहे.
Tanaji Sawant
Tanaji SawantSarkarnama
Published on
Updated on

आनंद खर्डेकर

Paranda News : आगामी काळात होणारी विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. परंडा विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या निवडणुकीत पालकमंत्री तानाजी सावंत विरुद्व माजी आमदार राहुल मोटे अशी लढत होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शिवसेना (Shivsena) शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पालकमंत्री सावंत (Tanaji Sawant) यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तालूक्यातील तीन माजी आमदारांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश दिला. (Tanaji Sawnat News)

धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) बुथ प्रमुख व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यामध्ये विरोधकांकडील मावळे गोळा करण्यास सुरुवात केल्याचे चित्र पहावयास मिळते. तालुक्यातील तीनही माजी आमदारांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा प्रवेश शनिवारी पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत झाला.

एकेकाळचे माजी आमदार राहुल मोटे यांचे समर्थक माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांनी माजी नगरसेवक समर्थकासह पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वात शिवसेनेत ( शिंदे गट ) प्रवेश केला.याच मेळाव्यात भाजप, शिवसेनेच्या (उबाठा ) काही कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यावेळी मेळाव्यात बोलताना पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले, 'विकास कामावर बोलायला विरोधकाकडे मुद्देच नाहीत.

मतदार संघातील विकासाची चर्चा करायला आपण कधीपण तयार आहोत. मतदारसंघात शेकडो कोटी रुपयांची विकास कामे झाली. रस्ते दवाखाने एमआयडीसीचे प्रश्न मार्गी लागले आहेत. मराठवाड्याचे हक्काचे पाणी देखील आपणच आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tanaji Sawant
Video Raj Thackeray : राज ठाकरेंचा शरद पवार, उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाले, 'मनोज जरांगे यांच्या आडून...'

यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके, जिल्हा समन्वयक गौतम लटके, माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर, ॲड. सुभाष मोरे, रिपब्लिकन पार्टीचे ( आठवले गट) प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे, रामचंद्र घोगरे, बाजार समितीचे संचालक विजयकुमार बनसोडे उपस्थित होते. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ( उबाठा) व भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशाने शहरात शिंदे गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पालकमंत्री डॉ. सावंत यांनी काँग्रेसची मातब्बर नेतेमंडळीसोबत घेतली होती. यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे, शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे समर्थक असलेल्या कार्यकर्तेसोबत घेण्याची मोहीम त्यांनी हाती घेतल्याचे चित्र आहे.

Tanaji Sawant
Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी दोन नावे फायनल; भाजप माजी खासदाराला तर अजितदादा देणार काँग्रेसमधून आलेल्या 'या' नेत्याला संधी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com