India Sarkarnama
देश

INDIA Alliance News : 'इंडिया' आघाडी पंतप्रधानपदाचे उमेदवार नितीश कुमार' ; कुणी केला दावा ?

Chetan Zadpe

Bihar News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून सुरू असताना 'इंडिया' आघाडीकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नितीश कुमार यांचे नाव आघाडीवर असल्याचा दावा बिहार विधानसभेचे उपसभापती महेश्वर हजारी यांनी केला आहे. त्यामुळे आता इंडिया आघाडीकडून यावर काय खुलासा करण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इंडिया आघाडीकडून पंतप्रधानाच्या उमेदवारांच्या नावावर कसलीच चर्चा झाली नाही. त्यामुळे या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. (Latest Marathi News)

बिहार विधानसभेचे उपसभापती आणि जदयूचे ज्येष्ठ नेते महेश्वर हजारी यांनी एका मुलाखतीप्रसंगी हा मोठा दावा केला आहे. इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नितीश कुमार यांचे नाव आघाडीवर असून, तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, त्यांच्या नावाची लवकरच घोषणा इंडिया आघाडीकडून केली जाईल, असा मोठा दावाही त्यांनी केला आहे.

नितीश कुमार देशातील सगळ्यात मोठे लोकप्रिय नेते असून, त्याचा फायदा इंडिया आघाडीला होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार हे पाच वेळेस केंद्र सरकारमध्ये मंत्री होते, तर १८ वर्षांपेक्षा अधिक काळ ते बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्याचा फायदा आगामी काळात इंडिया आघाडीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून आघाडीवर असल्याचेही त्यांनी सांगितले.

महेश्वर हजारी यांनी केलेल्या या विधानानंतर आता नितीश कुमार यांचे नाव इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून पुढे येणार का? त्यामुळे येत्या काळात त्यांच्या नावाची घोषणा केली जाते का ? की अजून दुसरे नाव पुढे येते, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT