ईशान्य भारतातील नागालँड या राज्याच्या मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात आमदार आश्चर्यकारक निवडून आले होते. यानंतर या सात आमदारांनी नागालँडमधील भाजप आघाडीला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर या सात आमदारांनी अजित पवार गटाला समर्थन दिले. यानंतर आता यातील दोन आमदार मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाकडून निवडून आलेले नागालँडचे दोन आमदार महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दर्शवल्यानंतर हे आमदार पहिल्यांदाच मुंबईत दाखल होत आहेत. मुंबईत येऊन ते पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट देणार आहेत. तसेच, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. येत्या सोमवारी आणि मंगळवारी महाराष्ट्रात त्यांचा मुक्काम राहणार आहे.
नागालँडच्या सर्व आमदारांचा अजित पवार गटाला पाठिंबा -
या आमदारांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सर्व आमदारांची पत्रकार परिषददेखील घेणार आहेत. या वेळी ते नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited by - Chetan Zadpe
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.