Jagdeep Dhankhar Sarkarnama
देश

Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड यांच्याविरोधात ‘INDIA’ने उचललं ऐतिहासिक पाऊल; अखेर काँग्रेसनं संधी साधली...

India Alliance Parliament Rajya Sabha No Confidence Motion : मागील वर्षी पावसाळी अधिवेशनातही जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याची तयारी विरोधकांनी केली होती.

Rajanand More

New Delhi : यंदाचे संसदेचे हिवाळी अधिवेशन ऐतिहासिक ठरले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे दररोज तहकूब करावे लागत आहे. या गदारोळातच आता विरोधकांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे.

इंडिया आघाडीने धनखड यांना पदावरून हटवण्यासाठी राज्यसभेतील सचिवालयात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर विरोधी पक्षांतील 60 खासदारांनी सह्या केल्याचे समजते. जगदीप धनखड हे उपराष्ट्रपतीही आहेत. त्यामुळे एकप्रकारे उपराष्ट्रपतींना हटवण्याची मागणी करणारा हा प्रस्ताव आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच उपराष्ट्रपतींना पदावरून हटवण्यासाठी राज्यसभेत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे.

संविधानातील कलम 67 बी नुसार उपराष्ट्रपतींना हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावावर सोनिया गांधी किंवा इतर कोणत्याही विरोधी पक्षांच्या सभागृह नेत्यांनी सही केलेली नाही. तर उद्योगपती गौतम अदानी मुद्द्यावरून काँग्रेसला साथ न देणाऱ्या तृणमूल काँग्रेसने या प्रस्तावासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि प्रमोद तिवारी तर तृणमूलचे खासदार नदीम उल हक आणि सागरिका घोष यांनी हा प्रस्ताव राज्यसभेच्या सचिवालयात दाखल केला. या प्रस्तावात विरोधकांनी सभापतींवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना बोलू दिले जात नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना जयराम रमेश यांनी सोशल मीडियात म्हटले आहे की, ‘सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याशिवाय इंडिया आघाडीकडे दुसरा पर्याय नव्हता. हा निर्णय घेणे खूप जड गेले. पण संसदीय लोकशाहीच्या हितासाठी हे पाऊल उचलावे लागले. हा प्रस्ताव राज्यसभेच्या सेक्रटरी जनरल यांच्याकडे सोपवला आहे.’

विरोधकांमध्ये फूट

अविश्वास प्रस्तावावर इंडिया आघाडीमध्ये एकी दिसून आली असली तरी बीजेडी या विरोधी पक्षाने त्याचे समर्थन केलेले नाही. हा प्रस्ताव इंडिया आघाडीने आणला असून आपण आघाडीतील घटक नसल्याचे बीजेडीचे खासदार सस्मित पात्रा यांनी स्पष्ट केले आहे. बीजेडी या प्रस्तावार तटस्थ राहील. या विषयाशी आपला काही संबंध नसल्याचे पात्रा यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT