High Court Judge : न्यायाधीशांचे वादग्रस्त विधान; थेट महाभियोग प्रस्तावाला सामोरे जावे लागणार?

Allahabad High Court Justice Shekhar Yadav Kapil Sibal Impeachment : न्यायाधीश शेखर यादव यांनी विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमात केलेले विधान वादात सापडले आहे.
Shekhar Kumar Yadav
Shekhar Kumar YadavSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : अलाहाबाद हायकोर्टातील न्यायाधीश शेखर कुमार यादव त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘कठमुल्ला’ असा शब्दप्रयोग करून वाद ओढवून घेतला आहे. तसेच त्यांची इतर विधानांवर अनेकांकडून आक्षेप घेण्यात आला आहे.

न्यायाधीश यादव यांच्या या विधानांवरून ज्येष्ठ विधिज्ञ व राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी थेट महाभियोग प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित केला आहे. भारत देश तोडण्याची भाषा त्यांनी केली आहे. राजकीय नेतेही अशी भाषा बोलत नाही. ते संविधानाचे संरक्षण करण्यासाठीच्या पदावर बसले आहेत. त्यांना असे शब्द शोभत नाहीत, अशी नाराजी सिब्बल यांनी व्यक्त केली आहे.

Shekhar Kumar Yadav
Parliament Winter Session : संसदेत प्रियांका गांधींच्या बॅगची चर्चा; राहुल गांधींनाही भुरळ, लोकसभा अध्यक्ष का भडकले?

महाभियोग प्रस्तावावर बोलताना सिब्बल म्हणाले, दिग्विजय सिंह, विवेक तन्खा, जावेद अली, मोहन झा आदींशी चर्चा केली आहे. आम्ही सर्वजण लवकरच भेटून संबंधित न्यायाधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणू. कोणताही मार्ग उरला नाही. जे लोक न्यायपालिकेच्या स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतात, ते सर्वजण आमच्यासोबत येतील.

पक्ष किंवा विरोधी पक्षाचा हा मुद्दा नाही. हा न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. पंतप्रधान, गृहमंत्री आणि सत्तेत बसलेले लोकही आम्हाला साथ देतील. कारण त्यांनी असे केले नाही तर ते संबंधित न्यायाधीशांसोबत आहेत, असे दिसेल. पंतप्रधान आणि सत्ताधारी पक्षाने महाभियोग प्रस्तावाला समर्थन द्यावे. त्यामाध्यमातून त्यांनी कोणतेही न्यायाशीध असे बोलू शकत नाही, असे संदेश द्यावा, असे आवाहन सिब्बल यांनी केले.

Shekhar Kumar Yadav
Shaktikanta Das : RBI मधील शेवटच्या दिवशी शक्तिकांत दास यांची मोदी, सीतारमण यांच्याविषयी पोस्ट; म्हणाले...

काय म्हणाले होते शेखर कुमार यादव?

शेखर कुमार यादव यांनी म्हटले होते की, हा देश बहुसंख्यांकांचा आहे. त्यांच्या इच्छेनुसारच हा देश चालले. हा कायदा आहे. एक न्यायाधीश म्हणून मी हे बोलत नाही. पण हे जे कठमुल्ला आहेत, हे शब्द योग्य नाही. पण बोलण्यात काहीच अडचण नाही, कारण ते देशासाठी वाईट आहेत. देशासाठी घातक आहेत. जनतेला भडकवणार लोक आहेत. त्यांच्यापासून सावध राहायला हवे, असे विधान न्यायाधीश यादव यांनी केले होते. कठमुल्ला म्हणजे कट्टर मौलवी किंवा धर्मांध असा अर्थ होतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com