Security forces initiate India's largest anti-Naxal operation to completely eradicate Naxalism from affected regions sarkarnama
देश

India Anti-Naxal Operation : भारत आता नक्षलवादाचेही करणार समूळ उच्चाटण! , आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेस झाली सुरूवात

India’s Historic Step Against Naxalism : तीन राज्यांच्या सीमेवरील घनदाट जंगलातील नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात तब्बल दहा हजार कमांडो निर्णायक लढाईसाठी घुसले

Mayur Ratnaparkhe

India launches biggest Anti-Naxal operation : जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतादी हल्ल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. शिवाय, संपूर्ण जगभरातूनही या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे. भारताने या दहशतवादी हल्ल्यास कठोरील कठोर प्रत्युत्तर देण्याची पूर्ण तयारी केली आहे आणि त्यानुसार पावलं उचलली जात आहेत. एकीकडे दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारताने कंबर कसली आहे, तर दुसरीकडे देशातली नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी अभियानास सुरुवात झालेली आहे.

छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमा ज्या भागात मिळतात, त्या क्षेत्रातील नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी तब्बल दहा हजारांहून अधिक कमांडो या अभियानात सहभागी झालेले आहेत. सुरक्षा दलांकडून प्रेसनोटद्वारे या अभियनास निर्णायक असे सांगितले आहे. त्यामुळे आता दहशतवादाबरोबरच नक्षलवाद्याचेही भारत समूळ उच्चाटण करणार असल्याचे दिसत आहे.

प्राप्त माहितीनुसार हे अभियान मागील चार दिवसांपासून सुरू आहे. कर्रेगट्टा, नाडापल्ली आणि पुजारी कांकेर येथील घनदाट जंगलांनी वेढलेल्या परिसरास नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानलं जातं. आता हा संपूर्ण परिसर कमांडो पिंजून काढत आहेत.

या विशेष अभियानत तब्बल दहा हजारांहून अधिक जवानांचा समावेश आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या C-60, तेलंगनाच्या ग्रेहाउंड्स आणि छत्तीगडच्या डीआरजी जवानांचा सहभाग आहे. हे सर्व जवान नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जंगलात घुसले आहेत आणि संपूर्ण परिसरार वेढलेलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देश २०२६ पर्यंत नक्षलवादमुक्त होईल, असा शब्द दिलेला आहे. त्या दृष्टीने भारत सरकारकडून कठोरातील कठोर पावलं उचलली जात आहेत. मोठ्याप्रमाणात नक्षलवादी भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्कारताना दिसत आहेत, तर अनेक ठिकाणी चकमकीत नक्षलींचा खात्माही होत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT