
Prime Minister Modi's Official Statement : जम्मू-काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्याने अवघा देश हादरला आहे. पंतप्रधान मोदी सध्या सौदी अरेबियाला असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना घटनास्थळा जाण्याचे आणि सद्यपरिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर अमित शाह हे देखील श्रीनगरला रवाना झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला सुनावले आहे. तर पंतप्रधान मोदींनी या दहशतवादी हल्ल्यावच्या घटनेवर प्रतिक्रिया देत कडक इशाराही दिला आहे.
पंतप्रधान मोदींनी 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध नोंदवतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहेत. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पीडित लोकांना शक्य तितकी सर्व मदत पुरवली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना शिक्षा होईल, त्यांना सोडले जाणार नाही! त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आपला निर्धार दृढ आहे आणि तो आणखी मजबूत होईल.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या पाच ते सहा पर्यटकांनी आधी पर्यटकांना त्यांचे नाव आणि मग धर्म विचारला व त्यानंतर त्यांना गोळ्या घातल्या. दहशतवाद्यांनी जवळपास ५० राउंड फायर केले. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे, जी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी निगडीत आहे.
प्राप्त माहितीनुसार या हल्ल्यात २५ पेक्षा अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर अनेकजण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे. पहलगामध्ये पर्यटनासाठी देशभरातील विविध राज्यांमधून मोठ्यासंख्येने पर्यटक दाखल झाले होते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची प्रत्यक्षदर्शी ठरलेल्या एका पीडित महिलेने एक खळबळजनक विधान केलं आहे. या महिलेने सांगितले आहे की, दहशतवाद्यांनी आधी लोकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांना गोळ्या घातल्या. महिलेने पीसीआरला फोन केला आणि सांगितले की, दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळी मारली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.