India-Pakistan rivalry beyond cricket : दुबईत भारताने आशिया कपच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियात पोस्ट करत भारतीय क्रिकेटपटूंना शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छा देताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरची आठवण काढत पाकिस्तानला डिवचले आहे. हे पाकच्या संरक्षणमंत्र्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहेत.
पाकिस्तानचे सरंक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टला प्रत्युत्तर देताना आपलीच टिमकी वाजवली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदींनी क्रिकेटची संस्कृती आणि भावना नष्ट केली. आपले राजकारण वाचविण्यासाठी शांती आणि समस्यांवर उपाय शोधण्याच्या शक्यता संपवत आहेत याप्रकारे शांतता निर्माण होणार नाही.
ख्वाजा आसिफ एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनीही भारत आणि पाकिस्तान संघर्षावर सूचिक विधान केले आहे. पाकिस्तान-भारत युध्दाचा स्कोर 6/0 होता. आम्ही काहीच म्हणत नाही. मोदींना भारत आणि जगात, दोन्ही ठिकाणी अपमानित करण्यात आले आहे, असेही ख्वाजा म्हणाले आहेत.
ख्वाजा यांचे हे विधान म्हणजे भारत आणि पाकिस्तान संघर्षादरम्यान पाकने भारताची 6 जेट्स विमाने पाडल्याचा दावा आहे. विशेष म्हणजे संरक्षणमंत्री ख्वाजा यांच्याआधी 72 तासांपूर्वी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या व्यासपीठावरून चार दिवसांच्या युध्दात भारतीय हवाई दलाची सात विमाने पाडल्याचा दावा केला होता. यापूर्वीही पाककडून अशी विधाने करण्यात आली होती. त्यांच्या बदलत्या दाव्यांमुळे त्यातील फोलपणा अनेकदा समोर आला आहे.
काय म्हणाले मोदी?
भारतीय संघाने पाकिस्तानला नमविल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘ऑपरेशन सिंदूर खेळाच्या मैदानावर. निकाल तोच, भारताचा विजय. आपल्या क्रिकेटर्सना विजयाच्या शुभेच्छा.’ मोदींचे ही पोस्ट सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली आहे.
दरम्यान, पाकिस्ताचा कर्णधार सलमान अली आगा याने लढतीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे. त्यावरूनही आता पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा पुन्हा फाटला आहे. पाक संघ सामन्यातून मिळालेली रक्कम भारताच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांना दान करणार आहे. भारताने 7 मेला केलेल्या हल्ल्यात सर्वसामान्य नागरिक नव्हे तर दहशतवादी मारले गेले आहेत. त्यामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेतील अतिरेक्यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.