Election update : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या. त्यानुसार पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत तर तमिळनाडूसह आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये एकूण २९४, तमिळनाडूत २३४, केरळमध्ये १४०, आसाममध्ये १२६ आणि पुद्दुचेरीमध्ये ३० अशा एकूण ८२४ विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या तीन राज्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजे ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर तमिळनाडूत २३ एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. केवळ पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिला टप्पा २३ एप्रिलला तर दुसरा टप्पा २९ एप्रिलला मतदान असेल. सर्व पाचही राज्यांमध्ये ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
एकूण जागा - २९४
मतदान - पहिला टप्पा - २३ एप्रिल
दुसरा टप्पा - २९ एप्रिल
मतमोजणी - ४ मे
तमिळनाडू विधानसभा निवडणूक
एकूण जागा - २३४
मतदान - २३ एप्रिल
मतमोजणी - ४ मे
केरळ विधानसभा निवडणूक
एकूण जागा - १४०
मतदान - ९ एप्रिल
मतमोजणी - ४ मे
आसाम विधानसभा निवडणूक
एकूण जागा - १२६
मतदान - ९ एप्रिल
मतमोजणी - ४ मे
पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक
एकूण जागा - ३०
मतदान - ९ एप्रिल
मतमोजणी - ४ मे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.