BJP alliance : नितीश कुमारांना पटवलं, आता भाजपकडून आणखी एका राज्यात बड्या नेत्यासोबत ‘बिग डील’?

TVK BJP alliance Tamil Nadu : तमिळनाडू विजय यांचे फॅन फॉलोअर्स लाखोंच्या संख्येत आहेत. निवडणुकीत त्याचा फायदा उचलण्यासाठी भाजपने ही रणनीती आखली आहे.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. आता सोमवारी (ता. १६) मतदानानंतर ते राज्यसभेचे सदस्य होतील. त्यानंतर मुख्यमंत्रिपदी त्यांच्या जागी भाजपचा नेता विराजमान होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. बिहार काबीज केल्यानंतर आता भाजपने आणखी एका राज्यात सत्तेसाठी एका बड्या नेत्याला मोठी ऑफर दिल्याचे समजते.

तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. राज्यात भाजपने एआयडीएमके या पक्षासोबत आघाडी केली आहे. मात्र, या आघाडीसमोर सत्ताधारी डीएमके पक्षाचे मोठे आव्हान आहे. सध्यातरी डीएमकेचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. त्यातच सुपरस्टार थलापती विजय यांनीही राजकारणात एन्ट्री घेत दोन्ही आघाड्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

विजय यांना राज्यात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भाजपने मोठी खेळी खेळली आहे. भाजपने थेट विजय यांना आघाडीत घेण्यासाठी डाव टाकला आहे. विजय यांना उपमुख्यमंत्रिपदाच्या ऑफरसोबत विधानसभेच्या ८० जागांची ऑफर दिल्याची चर्चा स्थानिक माध्यमांमध्ये आहे. दोन्ही पक्षांमधील चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.

Narendra Modi, Amit Shah
LPG rule change : LPG ग्राहकांना सरकारचा झटका; नियम बदलला, आता 'या' अटीमुळे मिळणार नाही सिलिंडर...

तमिळनाडू विजय यांचे फॅन फॉलोअर्स लाखोंच्या संख्येत आहेत. निवडणुकीत त्याचा फायदा उचलण्यासाठी भाजपने ही रणनीती आखली आहे. काँटे की टक्कर असलेल्या विधानसभा मतदारसंघात विजय यांची थोडीफार म्हणजे त्यांच्यामुळे किमान २ टक्के मते एनडीएच्या पारड्यात पडली तरी एकूण जागांच्या आकड्यात मोठा फरक पडू शकतो, अशी भाजपची रणनीती आहे.

एनडीएसोबत जाण्याचा निर्णय विजय यांनी घेतल्यास राज्याच्या राजकारणाला नवे वळण मिळू शकतो. ही आघाडी निर्णायकही ठरू शकते. डीएमकेसमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी विजय यांची भूमिका महत्वाची ठरू शकते. मात्र, अद्याप या आघाडीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. विजय यांच्या पक्षाकडून याबाबत अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. पक्षातील अनेक नेते या आघाडीवरून नाराज असल्याचीही चर्चा आहे.

Narendra Modi, Amit Shah
BJP operation Lotus : भाजपच्या ऑपरेशन लोटसला धक्का! दाव लावलेले तिन्ही मोठे मोहरे पहिल्याच परीक्षेत फेल...

विजय यांच्या पक्षातील काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार भाजपसोबत आघाडी केल्यास त्याची विपरीत चर्चा जनतेमध्ये होऊ सकते. मागील काही महिन्यांत विजय यांच्या रुपाने जनतेला तिसरा पर्याय मिळाला आहे. त्यांची वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे. अशावेळी आघाडी केल्यास चुकीचा संदेश जाऊ शकतो. तसेच विजय हे उपमुख्यमंत्री नव्हे तर मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये असल्याचा दावाही नेत्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आघाडी केल्यास पक्षाला नुकसान होण्याची भीतीही नेत्यांना वाटते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com