Even before the war with India has fully erupted, Pakistan has started pleading for international loans to manage its collapsing economy. The nation faces a deep financial and political crisis.  sarkarnama
देश

Pakistan Financially Bankrupt : युद्धाच्या आधीच पाकिस्तान भीकेला! कर्जासाठी पसरले हात

Pakistan requests loan IMF : पाकिस्तानाला आर्थिक मदत देण्याविषयी आंतरराष्ट्रीय नाणे निधीची आज बैठक होणार आहे. या बैठकीत पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या 1.3 अब्ज डॉलर निधिला मान्यता देण्यावर चर्चा होणार आहे.

Roshan More

India Pakistan War : भारताकडून पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. कराची बंदर भारतीय नौदलाने उद्ध्वस्त केले. भारताने पाकिस्तानचे 50 ड्रोन हवेतच उडवले. तसेच तीन फायटर प्लेन देखील पाडले. अधिकृतरित्या अजून युद्धाला सुरुवात झाली नाही मात्र त्याआधीच पाकिस्तानला भीक लागली आहे.

पाकिस्तान सरकारकडून ट्विट करत सांगण्यात आले की, शत्रूकडून झालेल्या नुकसानीमुळे कर्ज देण्याचे आवाहन आम्ही आमच्या आंतरराष्ट्रीय भागिदारांना करत आहोत. युद्धजन्य परिस्थिती आणि पैशांची कमतरता यामुळे मदतीचे आवाहन करत असल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे.

आर्थिक मदतीसाठी IMF ची बैठक

पाकिस्तानाला आर्थिक मदत देण्याविषयी आंतरराष्ट्रीय नाणे निधीची (IMF) आज बैठक होणार आहे. या बैठकीत पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या 1.3 अब्ज डॉलर निधिला मान्यता देण्यावर चर्चा होणार आहे. मात्र, पाकिस्तानला दिल्या जाणाऱ्या निधीला भारताकडून प्रखर विरोध करण्यात आला आहे.

मदतीचा वापर दहशतवादासाठी

पाकिस्तानला दिला जाणारा निधी हा दहशतवादासाठी वापरला जातो, असा आक्षेप भारताकडून घेतला जाणार आहे. त्यामुळे आर्थिक नाणेनिधीकडून दिली जाणारी मदत थांबवण्याची मागणी भारताकडून करण्यात येणार आहे. तसेच भारताकडून बैठकीत प्रखरपणे भूमिका मांडली जाणार आहे.

कराची बंदर उद्ध्वस्त

भारताच्या आयएनएस विक्रांतने गुरुवारी रात्री पाकिस्तानच्या कराची बंदरावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात कराची बंदर उद्ध्वस्त झाले. पाकिस्तान राजधानी इस्लामाबाद येथे देखील ड्रोनने हल्ला केल्याची माहिती आहे. भारताच्या हद्दीत घूसून हल्ला करणारे पाकिस्तानचे तीन लढाऊ विमानं भारतीय लष्कराने पाठली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT