India Attack On Pakistan : भारताविरुद्ध जिंकू शकत नाही! पाकिस्तानी नागरिक उतरले रस्त्यावर, केली मोठी मागणी

Pakistan India War Imran Khan : पाकिस्तान भारताविरुद्ध जिंकू शकत नाही, असे म्हणत मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचे नागरिक मध्यरात्री रस्त्यावर उतरल्याची माहिती आहे.
Pakistani citizens protest on the streets, demanding former PM Imran Khan’s release as tensions with India escalate.
Pakistani citizens protest on the streets, demanding former PM Imran Khan’s release as tensions with India escalate.sarkarnama
Published on
Updated on

India Pakistan War : भारत पाकिस्तानमध्ये युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या लष्कराकडून होत असलेले हल्ल्यांना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय लष्कराने कराची, इस्लामाबादमध्ये ड्रोनच्या सहाय्याने हल्ले केल्याने पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे.

पाकिस्तान भारताविरुद्ध जिंकू शकत नाही, असे म्हणत मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचे नागरिक मध्यरात्री रस्त्यावर उतरल्याची माहिती आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे जेलमध्ये आहे. त्यांना बाहेर काढा अशी मागणी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी केल्याची माहिती आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे भारताचा सामना करू शकणार नाहीत. भारताने पाकिस्तानमधून घुसून हल्ला केला आहे. या हल्ल्याचे प्रत्युत्तर पाकिस्तान लष्कर देऊ शकले नाही. कराची बंदरावर देखील आयएनएस विक्रांतने हल्ला केला.

भारताला सांगा हल्ला थांबावा, अशी याचना पाकिस्तानने जगभरातली देशांकडे केली आहे. तर, अमेरिकेने भारातला युद्ध थांबण्यास सांगू शकत नाही, असे म्हटले आहे.

Pakistani citizens protest on the streets, demanding former PM Imran Khan’s release as tensions with India escalate.
Indian Army Attack : फक्त 14 सेकंद आणि खेळ खल्लास! भारतीय लष्कराने दाखवला हल्ल्याचा 'तो' व्हिडीओ

लष्करप्रमुखाला अटक

भारताविरोधाच्या युद्धजन्य परिस्थितीला पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर जबाबादरा असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मीडियारिपोर्टनुसार मुनीर यांना लष्करप्रमुख पदावरून हटवण्यात आले असून त्यांना ताब्यात घेतल्याचे देखील म्हटले आहे. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे.

तहरीक ए इंसाफ अ‍ॅक्टिव्ह

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान जेलमध्ये आहेत. त्यांचा पक्ष तेहरिक ए इन्साफ अ‍ॅक्टिव्ह झाला असून इम्रान खान यांना जेलमधून बाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. भारत पाकिस्तान युद्धात इम्रान खान हेच नेतृत्व करू शकतात, असा दावा देखील पक्षाकडून केला जात आहे. पक्षाला बहुमत असताना कारस्थान रचून बहुमतापासून दूर ठेवण्यात आले. पाकिस्तानची जनता आपल्यासोबत असल्याचे देखील तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रवक्ते सांगत आहेत.

Pakistani citizens protest on the streets, demanding former PM Imran Khan’s release as tensions with India escalate.
India Pakistan War : भारतावर केलेला ड्रोन हल्ला पाकिस्तानच्या अंगलंट! लष्कराने थेट राजधानी इस्लामाबादलाच केलं लक्ष्य, मध्यरात्री नेमकं काय काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com