India Bans Airspace for Pakistani Aircraft : ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून आधीच पाकिस्तानला घायाळ केल्यानंतर आता भारत सरकारने पाकिस्तानला आणखी एक जबरदस्त दणका दिला आहे. पाकिस्तानी विमानांसाठी आता भारत सरकारने आपला एअरस्पेस २३ जून पर्यंत बंद केला आहे.
याआधी पाकिस्तानशी वाढत्या तणावादरम्यान सरकारने आज(२३ मे) पर्यंत NOTAM जारी केले होते. नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितले आहे की, भारतीय हवाई क्षेत्रात आता पाकिस्तानी प्रवासी विमान आणि लष्करी विमान प्रवेश करू शकणार नाहीत.
भारताने २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानी एअरलाइन्सला आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले होते. शिवाय, त्यानंतर पाकिस्तानी सैन्याचीही अनेक ठिकाणं नष्ट केली होती.
या आधी पाकिस्तानी एअरपोर्ट अथॉरिटीद्वारे जारी करण्यात आलेल्या NOTAMनुसार पाकिस्तानने शुक्रवारी भारतीय उड्डाणांसाठी आपले हवाई क्षेत्र २४ जून पर्यंत बंद केले होते. पाकिस्तानी एअरपोर्ट अथॉरिटीने सांगितले होते की, पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात उड्डाण भरणाऱ्या भारतीय विमानांनवर प्रतिबंध २४ जून २०२५ रोजी सकाळी ४.५९ वाजेपर्यंत वाढवण्यात आले आहेत.
तसेच ही बंदी भारतीय लष्करी विमानांनाही लागू होईल, भारतीय विमान कंपन्या किंवा ऑपरेटर्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही विमानांना पाकिस्तानी हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. असे निवेदनात म्हटले आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.