Asaduddin Owaisi : भाजप सातत्याने निवडणुका का जिंकत आहे? ; ओवैसींनी सांगितले मोठे कारण, म्हणाले...

Asaduddin Owaisi blames weak opposition : विरोधकांकडून 'एमआयएम'ला भाजपची बी टीम म्हटले जाते, शिवाय ओवैसी मोदी विरोधी मतांमध्ये फूट पाडण्याचं काम करतात असाही आरोप केला जातो. यावरही ओवैसींनी प्रतिक्रिया दिली आहे.
Asaduddin Owaisi narendra modi
Asaduddin Owaisi narendra modisarkarnama
Published on
Updated on

Asaduddin Owaisi Analyzes BJP’s Winning Strategy : एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप निवडणुकांमध्ये सातत्याने का विजयी होत आहे, यामागचे कारण सांगितले आहे. त्यांनी यासाठी विरोधी पक्षांचे अपयश आणि हिंदू मतदारांमध्ये निर्माण होत असलेली एकजुटीचा परिणाम कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी हेही म्हटले की त्यांच्यावर मोदी विरोधी मतदारांमध्ये फूट पाडण्याचा आरोप करणे चुकीचे आहे.

ओवैसींनी शनिवारी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, माझ्यावर आरोप कसा काय लावला जावू शकतो, सांगा? ते म्हणाले की, जर मी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत हैदराबाद, औरंगाबाद, किशनगंज आणि काही अन्य जागांवर निवडणूक लढवत असेल आणि भाजपला २४० जागा मिळत असतील तर काय मी जबाबदार आहे?

ओवैसींनी म्हटले की, भाजप सत्तेत येत आहे, कारण विरोधी पक्ष अपयशी आहे. भाजप निवडणूक जिंकत आहे, कारण, त्यांनी जवळपास ५० टक्के हिंदू मतदार आपल्या बाजूने केले आहेत. तसेच ओवैसी म्हणाले की, आमच्यावर आरोप करणे आणि आम्हाला भाजपची बी टीम म्हणण्याचा प्रयत्न हा केवळ विरोधकांचा आमच्या पक्षाबद्दलचा द्वेष आहे, बाकी काही नाही. कारण, आमचा पक्ष प्रामुख्याने मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करतो.

Asaduddin Owaisi narendra modi
Nilesh Chavan : वैष्णवी हगवणेचं बाळ ताब्यात ठेवणाऱ्या निलेश चव्हाण विरोधातही अखेर गुन्हा दाखल!

विरोधी पक्षांकडून एमआयएमवर मोदी विरोधी मतांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप केला जातो, यावर ओवैसींनी पलटवार करत म्हटले की, विरोधी पक्ष मुस्लिमांकडे केवळ निवडणुकीतील फायदा घेण्याच्या दृष्टीनेच पाहतो, त्यांच्या वास्तविक मुद्य्यांकडे लक्षच देत नाही.

Asaduddin Owaisi narendra modi
Rahul Gandhi questions PM Modi : तुमचं रक्त फक्त कॅमेऱ्यांसमोरच का गरम होतं? ; ‘तो’ व्हिडिओ शेअर करत राहुल गांधींचा मोदींना थेट सवाल!

ओवैसींनी प्रश्न उपस्थित केला की, जेव्हा समाजातील प्रत्येक वर्गास राजकीय नेतृत्व मिळू शकतं, तर मुस्लिमांना का नाही?, यावर तुमचा इशारा काँग्रेसकडे आहे का? अशी विचारणा झाल्यावर ओवैसींनी सांगितले, की त्यांचा इशारा बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टीसह सर्वच राजकीय पक्ष आणि भाजपकडे आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com