Election Commission Gyanesh Kumar Rahul Gandhi  Sarkarnama
देश

Gyanesh Kumar: इंडिया आघाडीचा ज्ञानेश कुमारांविरोधातील 'महाभियोग कार्यक्रम' स्थगित, राहुल गांधींनी सांगितलं कारण

Jan Impeachment Programme : भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनं आणि मागण्या करुन झाल्यानंतर आता त्यांच्याविरोधात लोकसभेत आणला जातो तसा 'जन महाभियोग प्रस्ताव' कार्यक्रमाची योजना इंडिया आघाडीनं आखली होती.

Amit Ujagare

Jan Impeachment Programme : भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनं आणि मागण्या करुन झाल्यानंतर आता त्यांच्याविरोधात लोकसभेत आणला जातो तसा 'जन महाभियोग प्रस्ताव' कार्यक्रमाची योजना इंडिया आघाडीनं आखली होती. त्यासाठीचा कार्यक्रमही तयार करण्यात आला होता, पण आता हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी हा कार्यक्रम स्थगित करण्यामागचं कारणंही सांगितलं आहे.

नवी दिल्लीत ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात 'जनमहाभियोग' कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. पण आता हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असून उद्या या कार्यक्रमाचं (३१ ऑक्टोबर) आयोजन केलं जाणार आहे. "दिल्लीत होत असलेला पाऊस आणि खराब हवामानामुळं हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती स्वतः राहुल गांधी यांनी दिली.

राहुल गांधी यांनी सांगितलं की, रविवारी १ नोव्हेंबर रोजी चलो दिल्ली मार्च आणि रॅली होणार आहे. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि त्यांच्या टीमकडून लोकशाहीला संपवण्याच्या सुरु असलेल्या प्रयत्नांविरोधात आहे.

राहुल गांधी असाही आरोप केला की, गृहमंत्री लोकांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी संपूर्ण तयारी केलेली आहे. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि सर्वसाधारण लोकांना थांबवलं जात आहे. रामलीली मैदानात होणाऱ्या घटना पाहिल्यास तुमच्या हे लक्षात येईल की, देशात काय सुरु आहे. लोकांमधये प्रचंड राग आहे कारण लाखो लोकांना आपल्या मताधिकारापासून वंचित केलं जात आहे.

राहुल गांधींनी सांगितलं की, जो कोणी संविधानाचं रक्षण करु इच्छित आहे, तो या मोर्चात आणि आंदोलनात सहभागी होऊ शकतो. टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी सांगितलं की, इंडिया आघाडी या लढाईत एकजूट आहे आणि मिळून जिंकून येईल.

खर्गे मांडणार महाभियोग प्रस्ताव

सुत्रांच्या माहितीनुसार, लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार इंडिया आघाडीच्या जनमहाभियोग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. पण खर्गे ज्ञानेश कुमारांविरोधात महभियोग प्रस्तव मांडतील. तसंच याप्रस्तावावर राहुल गांधी आपली बाजू मांडणार आहोत. या प्रस्तावावेळी इंडिया आघाडीतील सर्वच नेत्यांना बोरण्याची संधी मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT