

Ravindra Dhangekar: मुंबईत काल एका पुस्तक प्रकाशनाच्या खासगी कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना युबीटी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आले होते. व्यासपीठावर दाखल होण्यापूर्वी त्यांची औपचारिक चर्चा देखील झाल्याचं देखील समोर आलं आहे. यापार्श्वभूमीवर शिंदेंच्या सेनेचे पुणे महानगरप्रमुख रविंद्र धंगेकर यांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे-शिंदे एकत्र येणार असल्याचा सूचक दावा त्यांनी केला आहे.
सामच्या प्रतिनिधीशी बोलताना धंगेकर म्हणाले, "ही महाराष्ट्राची परंपरा आहे, विचारांची देवाण-घेवाण झाली पाहिजे. एक कार्यकर्ता म्हणून मला बरं वाटलं मधल्या काळात हा संवाद तुटला होता कुरघोडीच्या राजकारणामुळं. त्यांच्या चर्चेतून महाराष्ट्राच्या हिताचे अनेक विषय होऊ शकतात"
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असी सर्व शिवसैनिकांची मागणी असताना फडणवीस आणि ठाकरे एकत्र येण्यानं वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. त्यावर धंगेकर म्हणाले, "यावर आता केंद्र सरकारची नजर आहे, सगळ्या वरिष्ठांची याकडं नजर आहे. राज्य शासनाचा कस लागणाऱ्या नुकत्याच झालेल्या शिक्षक-पदवीधरच्या निवडणुका होत्या, पण इथं कस कमी पडलेला दिसतोय. याचं खरं काम एकनाथ शिंदे करतील त्यामुळं केंद्राचा जर निश्चय झाला तर एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्री होतील ना!"
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे एकत्र येतील असं वाटतं का? या प्रश्नावर धंगेकर म्हणाले, "महाराष्ट्राची परंपरा आहे, शिवसेनाप्रमुखांचे ठाकरे रक्त आहेत, आणि शिवसेनाप्रमुखांचे विचार एकनाथ शिंदे आहेत त्यामुळं हे लांबचं अंतर नाही ते कधीतरी जुळणार आहे"
भाजपच्या आजच्या चिंतन बैठकीत मला बोलवायला हवं, मी त्यांना विनंती करतो की मला त्यांनी कार्यकर्ता म्हणून बोलवा मी त्यांना दोन-तीन सूचना देऊ शकतो. चिंतन बैठक माझ्यामुळं योग्य टोकापर्यंत जाईल. निवडणुकीपूर्वी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी सर्व नगरसेवकांची बैठक घेतली होती, पण ती जर मित्रपक्षाची घेतली असती तर त्यामुळं चांगला फरक पडला असता. कुरघोडीचं राजकारण थांबवलं तर चिंतन बैठक योग्य पद्धतीनं होईल. महायुतीतल्या मित्रपक्षांमध्ये आलेली सूज कमी करण्याची गरज आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.