Justin Trudo : Narendra Modi  Sakarnama
देश

India Canada Dispute : भारत-कॅनडा तणावाचा परिणाम सामान्यांच्या जेवणावर; मसूरडाळ महागणार ?

India Canada Updates : अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांनी मसूरचा साठा वाढवण्यास सुरुवात केली

Chetan Zadpe

Delhi News : कॅनडा व भारत यांच्यातील संबंध ताणले गेल्याचा परिणाम आता थेट जेवणावर होणार आहे. येत्या काळात कॅनडातून त्याचा परिणाम मसूरडाळीच्या आयातीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात मसूरडाळीच्या किमतीत वाढ होणार आहे. कॅनडातील हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणामुळे भारत व कॅनडाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. नुकताच कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी संसदेत या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप केला. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. (Latest Marathi News)

कॅनडातून भारताला मोठ्या प्रमाणात मसूरडाळ आयात होते. दोन्ही देशांदरम्यान संबंध ताणले गेल्याने त्याचा परिणाम मसूरडाळ आयातीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात भारतीय बाजारपेठेत मसूरडाळीच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅनडा व भारतातील संबंध बिघडले आहेत.

दुसरीकडे कॅनडात यंदाच्या दुष्काळामुळे मसूरच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. यानंतर आयातदार आणि व्यापाऱ्यांनी मसूरचा साठा वाढवण्यास सुरुवात केली. याशिवाय भारतात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे डाळींच्या उत्पादनात घट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिस्थिती लक्षात घेता सरकारने आधीच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

कॅनडासोबत राजकीय वादामुळे मसूरडाळ आयातीवर परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॅनडामधील ताज्या प्रकरणामुळे डाळींची आयात किंवा त्यांच्या किमतीत कोणताही फरक पडणार नाही. भारताने अलीकडेच अमेरिकेतून डाळींच्या आयातीवरील कस्टम ड्यूटी हटवली आहे.

वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि व्यापार संस्थांनी सांगितले की, कॅनडासोबतच्या राजनैतिक वादाचा मसूरडाळीच्या गरजांवर परिणाम होण्याची शक्यता नाही. कारण भारताने डाळीच्या आयातीत विविधता आणली असून, आता कोणत्याही एका देशावर जास्त अवलंबून नाही. याशिवाय भारताने अलीकडेच अमेरिकेतून आयात होणाऱ्या मसूरडाळींना सीमाशुल्कातून पूर्णपणे सूट दिली आहे, त्यानंतर डाळींच्या किमतीत तुटवडा किंवा वाढ होण्याची शक्यता नाही.

जोपर्यंत कॅनडा आपल्या भूमीतून भारतविरोधी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत त्याच्याशी मुक्त व्यापार करारावर चर्चा केली जाणार नाही, अशी भूमिका भारताने घेतली आहे. सुमारे दशकभरानंतर दोन्ही देशांमध्ये एफटीएवर चर्चा सुरू होणार होती. मात्र, भारताकडून हे विधान आल्यानंतर कॅनडाने पुढील महिन्यात भारतभेटीत होणारे करार तूर्तास स्थगित केले आहेत.

Edited By - Chetan Zadpe

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT