Ramesh Bidhuri News : भाजप खासदार विधुरींविरोधात सुप्रिया सुळे आक्रमक; हक्कभंगाचा प्रस्ताव येणार...

Supriya Sule Against Ramesh Bidhuri : लोकसभेच्या कामकाजातून रमेश बिधुडी यांचे वक्तव्य काढून टाकण्यात आले.
Ramesh Bidhuri News
Ramesh Bidhuri News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Delhi News : भाजपचे नेते व खासदार रमेश विधुरी यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष यांना एक नोटीस दिली आहे. बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अलींना विधुरी यांनी नवीन संसदेच्या सभागृहात शिवीगाळ केली. जातीयवादी शेरेबाजीही करण्यात आली. याच विरोधात आता सुळे यांनी नोटीस पाठवली आहे. तृणमूल काँग्रेसच्या अपूर्वा पोतदार आणि द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनीही नोटीस दिल्या असल्याची माहिती आहे. यामुळे आता विधुरींविरोधात महिला खासदार चांगल्याच आक्रमक झाल्याने त्यांची अडचणी आता वाढल्या आहेत.

(Latest Marathi News)

Ramesh Bidhuri News
MP Ramesh Bidhuri : भाजप खासदार रमेश बिधुडींचे संसदेत वादग्रस्त वक्तव्य; राजनाथ सिंहांनी मागितली माफी

दरम्यान, भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांनी लोकसभेत बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपवर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला. रमेश बिधुरी यांनी बसप खासदार दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यानंतर लोकसभेच्या कामकाजातून रमेश बिधुडी यांचे वक्तव्य काढून टाकण्यात आले.

रमेश बिधुरी हे लोकसभेत चांद्रयान ३ च्या संदर्भात बोलत होते. याचवेळी बिधुडी यांनी खासदार दानिश अली यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त शब्दांचा वापर केला. त्यामुळे विरोधक चांगलेच संतापले. काँग्रेस आणि 'टीएमसी'ने रमेश बिधुरी यांच्या वक्तव्यावरून भाजवर जोरदार टीका केली होती.

Ramesh Bidhuri News
Tatkare On Supriya Sule : सुप्रिया सुळे भाग्यवान, त्यांना अजितदादांसारखा भाऊ मिळाला; सुनील तटकरेंचे प्रत्युत्तर

रमेश बिधुरी हे भाजपचे दक्षिण दिल्लीतील खासदार आहेत. त्यांनी बसप खासदार दानिश अली यांना दहशतवादी म्हणून सभागृहात संबोधल्याने विरोधकांनी त्यांच्या शब्दावर आक्षेप घेतला. रमेश बिधुरी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर भाजपचे माजी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे लोकसभेत हसताना दिसले. त्यामुळे विरोधकांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.