CNG Price Hike | Petrol Diesel Rates Impact Budget Sarkarnama
देश

CNG Price Hike : पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या धक्क्यातून सावरण्याआधीच CNG च्या दरात मोठी वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार...

CNG Rates Impact Budget : सीएनजीच्या दरवाढीमुळे टॅक्सी आणि कॅब चालकांककडून भाडेवाढ केली जाण्याची दाट शक्यता आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीसह सीएनजीचे दर वाढल्याने विविध शहरांतील टॅक्सी, ऑटो चालकांनी भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे.

Jagdish Patil

CNG Price Hike : आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे मोठी कात्री लागली. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या धक्क्यातून सावरण्याआधीच आजपासून सीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.

सीएनजी मंगळवारपासून (ता.२६) गॅस दोन रुपयांनी महागला आहे. त्यामुळे नागरिकांना या दरवाढीचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे. वाढलेल्या दरामुळे सध्या राजधानी दिल्लीमध्ये सीएनजीचे दर प्रति किलो 81.09 रुपयांवरून 83.09 रुपये इतके झाले आहेत.

सीएनजीच्या दरवाढीमुळे टॅक्सी आणि कॅब चालकांककडून भाडेवाढ केली जाण्याची दाट शक्यता आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीसह सीएनजीचे दर वाढल्याने विविध शहरांतील टॅक्सी, ऑटो चालकांनी भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, एकीकडे 15 मे पासून तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र सुरू केले आहे. काल सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेली वाढ ही मागील दहा दिवसांतील चौथी दरवाढ होती.

तर दुसरीकडे सीएनजीचे दर देखील 15 मे पासून आतापर्यंत चारवेळा वाढवण्यात आले आहे. मागील दहा दिवसांत सीएनजी प्रति किलो 6 रुपयांनी महागला आहे. त्यामुळे आता टॅक्सी चालकांसह सर्वसामान्याचं बजेट कोलमडलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT