Petrol Diesel Price Hike : एकीकडे देशभरात महागाईने डोकं वर काढल्याने लोकांना रोजच्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तर दुसरीकडे इंधनाचे दर गगनाला भिडले असतानाच आता पुन्हा एकदा तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे.
सोमवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपरांनी वाढ केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दहा दिवसांत इंधनाच्या दरात दरवाढ होण्याची ही चौथी वेळ आहे.
पेट्रोल आणि डिझेलमध्ये झालेल्या दरवाढीमुळे आता दिल्लीत डिझेलचा दर 95.20 रुपये प्रति लिटर तर पेट्रोलचा दर 102.12 रुपये प्रति लिटर झाला आहे. दिल्लीनंतर मुंबईत पेट्रोल 111.21 रूपये, तर डीझेल 97.83 रूपये प्रति लीटर इतके झाले आहे.
15 मे पासून तेल कंपन्यांनी दरवाढीचे सत्र सुरू केले असून तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लीटर तब्बल 7.5 रुपयांची वाढ झाली आहे. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे ही दरवाढ होत असली तरी या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भार सोसावा लागत आहे.
शिवाय दरवाढीसह इंधन टंचाई देखील मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यापूर्वीची कामे डिझेल मिळत नसल्याने रखडली आहेत. दरम्यान, नव्या दर वाढीमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पेट्रोल डिझेलचे दर नेमके किती आहेत ते जाणून घेऊया.
मुंबई -
पेट्रोल - 111.12 रुपये प्रति लिटर.
डिझेल - 97.68 रुपये प्रति लिटर.
नागपूर -
पेट्रोल - 111.70 रुपये प्रति लिटर.
डिझेल - 98.76 रुपये प्रति लिटर.
सोलापूर -
पेट्रोल - 111.87 रुपये प्रति लिटर.
डिझेल - 98.55 रुपये प्रति लिटर.
कोल्हापूर
पेट्रोल - 111.77 रुपये प्रति लिटर.
डिझेल - 98.46 रुपये प्रति लिटर.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.