V Anantha Nageswaran Sarkarnama
देश

India Economy 2026 : 1991 सारखेच आर्थिक संकट? भारतासमोर चीनचे नवे आव्हान; मुख्य आर्थिक सल्लागारांचा मोठा इशारा!

India faces new economic challenges amid global tensions and China export restrictions. Chief Economic Adviser V Anantha Nageswaran explains why supply chain risks matter : परकीय चलनाचे संकट नसले तरी जागतिक राजकारणामुळे भारताची आर्थिक कोंडी; आगामी 20 ते 30 वर्षांत पुरवठा साखळीतील तुटवडा ठरणार सर्वात मोठे आव्हान.

Pradeep Pendhare

India Economic Crisis 2026 : चालू आर्थिक वर्षे 2026 हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 1991 सालातील संकटासारखेच आहे. त्यामुळे आर्थिक वाटचालीसाठी हे वर्षे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मात्र 1991 सारखे परकीय चलनाचे मोठे संकट भारतासमोर उभे नाही, असे प्रतिपादन भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी केले.

1991 मध्ये चार दशकांपासून साचलेल्या समस्यांमुळेच सुधारणांचा निर्णय घ्यावा लागला होता. तर आज बाह्य तणाव आणि देशांतर्गत मर्यादांमुळे भारताला आपल्या आर्थिक (Economy) धोरणाचा नव्याने विचार करावा लागत आहे, असे व्ही अनंत नागेश्वरन यांनी म्हटले. देशांतर्गत उत्पादन, ऊर्जा, शेती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतील आव्हानांसोबतच, प्रतिकूल जागतिक स्थितीचा सामना भारत सध्या करत आहे, असेही त्यांनी म्हटले.

सध्याची संकटे ही नैसर्गिक नाहीत. जागतिक राजकारणापासून निर्माण झालेली आहेत. त्यातून भारतात (India) अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. हे सांगताना गेल्याच आठवड्यात भारताला मोठी गरज असलेल्या टनेल बोरिंग मशीन आणि इतर पायाभूत सुविधांच्या उत्पादनांच्या निर्यातीवर चीनने परवाना प्रणाली लागू केली. अशा प्रकारे देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी केली जात असल्याचे व्ही. अनंत नागेश्वरन यांनी म्हटले.

करोनापूर्व काळातील संकटांकडे लक्ष वेधताना, मागणी कमी असल्यामुळे येत होती. त्यावर व्याजदर कमी करणे, सरकारी आर्थिक पॅकेज देणे यांसारख्या उपयांनी ती सोडवता येत होती. मात्र आगामी 20 ते 30 वर्षांत पुरवठा साखळीतील तुटवडा हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. हे आव्हान रिझर्व्ह बँक किंवा सरकारच्या आर्थिक धोरणांनी सहजासहजी सोडवता येणार नाही, याकडे व्ही. अनंत नागेश्वर यांनी सांगितले.

या आव्हानानंतर देखील भारत हा स्थिर आणि भक्कम अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू ठरत आहे. भारताला आपल्या आर्थिक धोरणाचा नव्याने विचार करावा लागणार आहे, याकडे देखील व्ही. अनंत यांनी लक्ष वेधले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT