नवी दिल्ली: रशिया युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) युद्ध सुरु होऊन आता तीन आठवडे उलटून गेले आहेत. मात्र युद्ध अद्यापही सुरुच आहे. रशिया युक्रेनच्या एका-एका शहरावर कब्जा मिळवत आहे. असे असतानाच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने 3 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाच्या आयातीसाठी रशियन तेल कंपनीसोबत करार केला आहे. (India finalizes agreement with Russia to import 3 million barrels of crude oil)
मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये थेट चर्चा झाली असून हा करार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. रशियासोबतचा हा करार सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतासाठी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम अटी व शर्तींच्या आधारे करण्यात आला आहे. रशियाने युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभुमीवर अमेरिकेने तेल आयात बंदीसह पाश्चात्य देशांनीही रशियावर निर्बंध लादले आहेत.
मात्र भारतीय तेल कंपन्यांवर रशियन तेल कंपन्यांकडून क्रूड खरेदी करण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादताच रशियाने भारतासह इतर मोठ्या आयातदारांना सवलतीच्या दरात तेल विक्रीचा ऑफर दिली. सध्या इतर भारतीय तेल कंपन्याही कच्च्या तेलाच्या आयातीसाठी रशियन तेल कंपन्यांशी करार करू शकतात. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 च्या वर पोहोचल्या असताना हा करार करण्यात आला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक बाजार पेठेत तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत.
भारत आपल्या गरजेच्या 80 टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची आयात करतो. या आठवड्याच्या सुरुवातीला भारत आणि रशियन फेडरेशन यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा करार करण्यात आला. दरम्यान, "गेल्या काही आठवड्यांपासून लष्करी कारवाई सुरू झाल्यानंतर सरकार सर्व उपलब्ध पर्यायांचा विचार करेल," अशी माहितीही केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी सोमवारी (१४ मार्च) राज्यसभेत दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.