नवी दिल्ली : उत्तरप्रदेशात (uttar pradesh)भाजपला ऐतिहासक विजय मिळाला आहे. योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा आपल्या पक्षाची सत्ता स्थापन करणार आहेत. योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळाचा (Yogi Adityanath swearing-in ceremony) शपथविधी २५ मार्च रोजी होणार आहे.
403 सदस्यांच्या विधानसभेत भाजपने 255 जागा जिंकून सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशात सत्ता राखली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपला अशा नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करायचा आहे, ज्याद्वारे सर्व मतदारांना एकत्र करता येईल आणि लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवता येतील.
योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री राहिलेल्या केशव प्रसाद मौर्य यांचा यंदा पराभव झाला. त्यांनी सिरथू विधानसभेतून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. आता योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये ते पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
योगी आदित्यनाथ सरकरच्या दुसऱ्या कार्यकाळाचा शपथविधी कार्यक्रम लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
२५ मार्च, शुक्रवारी दुपारी ४ वाजता हा सोहळा होणार आहे. स्टेडियममध्ये ५० हजार जण बसू शकतील एवढी क्षमता असून, याशिवाय सुमारे २०० व्हीव्हीआयपींसाठी स्टेडियममध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि देशभरातील प्रमुख नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे समजते. काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांनाही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केलं जाणार आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार, कुणाला डच्चू मिळणार यांच्या चर्चा सध्या उत्तरप्रदेशात रंगल्या आहेत. पण भाजपने उत्तरप्रदेशात आपला फॅार्म्युला अगोदरच ठरवला असल्याचे समजते. मात्र खराब कामगिरी केलेल्या मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. जातीय-प्रादेशिक समीकरण, महिला-युवावर्गाला आदी मुद्दावरुन योगी आदित्यनाथ यांचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.