Maharashtra rain forecast : देशाच्या हवामान खात्याने मान्सूनच्या स्थितीचा पुढील चार महिन्यांचा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार देशात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण केवळ ९० टक्क्यांपर्यंतच असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जून महिन्यात अनेक भागात उष्णतेच्या लाटेचे चटके सोसावे लागण्याची शक्यता आहे. इराण युध्दामुळे आधीच आर्थिक संकट घोंघावत असताना आता पाऊसही हुलकावणी देण्याची भीती आहे.
हवामान खात्याने शुक्रवारी देशातील मान्सूनच्या स्थितीचा अंदाज वर्तविली आहे. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे, संपूर्ण देशात पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या ९० टक्के असण्याची शक्यता आहे. याचा अर्थ, २०२६ च्या मान्सून हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव जाणवणार आहे.
काय म्हटले आहे हवामान खात्याने?
१. देशातील ईशान्य भारतात पाऊस सामान्य म्हणजेच ९४ ते १०६ टक्के राहण्याची शक्यता आहे. तर मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा पावसाची शक्यता ९४ टक्क्यांपेक्षा कमी आणि वायव्य भारतात ९२ टक्क्यांपेक्षी कमी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
२. प्रामुख्याने पावसावर अवलंबून असलेल्या कृषी क्षेत्र म्हणजेच Monsoon Core Zone मध्येही ९४ टक्केंपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे.
३. वायव्य आणि ईशान्य भारतातील काही भाग, दक्षिण पूर्वेकडील भाग, लगतच्या पूर्व-मध्य भारतातील काही भाग आणि पूर्व भारतातील काही तुरळक भाग वगळता, देशाच्या बहुतेक भागांमध्ये मोसमी पाऊस सरासरीपेक्षा कमी असण्याची दाट शक्यता आहे.
४. जून महिन्यात संपूर्ण देशातील सरासरी पर्जन्यमान ९२ टक्क्यांपेक्षा कमी राहील, असा अंदाज आहे.
५. देशाच्या बहुतेक भागांमध्ये जून महिन्यातील पाऊस कमी असण्याची दाट शक्यता आहे. वायव्य भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण भारतातील काही भाग आणि मध्य भारतातील तुरळक ठिकाणी पाऊस सरासरीएवढा पडेल, असा अंदाज आहे.
६. मध्य, वायव्य आणि पूर्व भारतातील काही भाग वगळता जून महिन्यात देशाच्या बहुतेक भागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
७. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेशच्या अनेक भागांमध्ये, तसेच महाराष्ट्र, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये काही दिवस उष्णतेची लाट अपेक्षित आहे. राजस्थान आणि झारखंडमध्ये तुलनेने हे दिवस कमी असतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.